आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे हर्षाचे नववर्ष.. नववर्षाचा हा हर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रामुख्याने ५१ फुटी गुढी, महिलांची बाइक रॅली आणि ढोलपथकांचा समावेश ही प्रमुख आकर्षणे आहेत. सकाळी ६.३० वाजता नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे महात्मानगर, निर्मलनगर, नरसिंहनगर, श्रीराम मंदिर पंपिंग स्टेशन, पंडित कॉलनी, कॉलेजरोड, तिडके कॉलनी, संभाजी चौक या ठिकाणांहून निघणाऱ्या स्वागतयात्रांचा समारोप बीवायके चौकात सकाळी वाजता होईल.
नरसिंहनगर येथे महिलांची बाइक रॅली निघणार असून, पारंपरिक वेशभूषांमध्ये महिला अाबालवृद्धांना सहभागाचे आवाहन केले आहे. जुने नाशिक पंचवटी येथे संस्कृती संवर्धन न्यास संचलित स्वागतयात्रा समितीतर्फे सकाळी ६.२९ वाजता साक्षी गणेश मंदिर, सुंदरनारायण मंदिर, द्वारका शिवाजी चौक आणि नागचौक पंचवटी येथून शोभायात्रा निघेल. ज्यांचा समारोप ९.३० वाजता गंगा पटांगण येथे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रवचनाने होणार आहे.
इंदिरानगर, गणेश चौक, राणाप्रताप चौक, लेखानगर येथील शोभायात्रेत ४० चित्ररथ असतील. राणाप्रताप चौक येथे ढोलवादन ५१ फुटी गुढी उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे. एकंदरीत शहरात कार्यक्रमांची रेलचेल असताना गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत जोरदार साजरे करण्याचा मानस या संस्थांचा आहे.
नाशिक | गुढीपाडव्याच्यापार्श्वभूमीवर बाजारात सध्या चैतन्य पसरले असून, त्यामुळे बाजारपेठ दाेन दिवसांपासून गर्दीने फुलून गेली अाहे. गुढीला बांधण्यासाठी हार, कडे तसेच काठ्या खरेदी करण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली हाेती. यंदा गुढी पाडव्याच्या दिवशी देखील सराफ बाजार बंद राहणार असल्याने नागरिकांनी गृहाेपयाेगी वस्तू अाणि वाहनांच्या दालनांमध्ये बुकिंगसाठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून अाले. शुक्रवारी (दि. ८) सकाळपासून शहराच्या विविध भागांमधून शाेभायात्रा निघणार असून, त्यात सहभागी हाेण्याचे नियाेजनदेखील होत अाहे. सूर्याेदयापासून सकाळच्या वेळेत गुढी उभारणे धर्मशास्त्राला अनुसरून सांगण्यात आले असून, यावेळी गुढीसह पंचांगाचे पूजन करावे, अशी माहिती प्रदीप बाेरकर गुरुजी यांनी दिली.
कडुनिंबाच्या फांद्या बाजारात : गुढीलाबांधण्यासाठीचे हार, कडे अाणि काठ्या खरेदी करण्याबराेबरच दुर्मिळ झालेल्या कडुनिंबाच्या फांद्यादेखील गुरुवारी (दि. ७) बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या हाेत्या. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत रस्ताेरस्ती या विक्रेत्यांनी दुकाने थाटली हाेती.

शुक्रवारी अाेढणार बारा गाड्या
नाशिक | गुढीपाडव्याच्या दिवशी भवानी मातेच्या यात्राेत्सवानिमित्त सातपूरला बारा गाड्या अाेढण्याचा कार्यक्रम हाेत असताे. त्याची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि.८) सायंकाळी वाजता बारा गाड्या अाेढण्याचा, तर शनिवारी (दि.९) सायंकाळी वाजता कुस्त्यांची दंगल हाेणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष दीपक माैले यांनी दिली.

यंदा मंगेश निगळ यांना बारा गाड्या अाेढण्याचा मान अाहे. यशस्वीतेसाठी याेगेश अाहेर, सुनील माैले, पाेपट बंदावणे, दाैलत वागळे, निलेश भंदुरे, भावेश पवार, संजय चव्हाण, राजेश काळे, राजाराम पाटील निगळ, मधुकर माैले, रमेश काळे, शांताराम निगळ, अॅड. जगन्नाथ निगळ, छगन भंदुरे, रवी काळे, बाळासाहेब साेनवणे, वसंत पंडित, काेळप्पा धाेत्रे अादी प्रयत्नशील अाहेत.

कमिटीचे अध्यक्ष दीपक माैले उपाध्यक्ष गाेकुळ निगळ यांनी नुकतीच यात्राेत्सव कमिटी जाहीर केली अाहे. यात सरचिटणीसपदी सतीश काळे, चिटणीसपदी कांतीलाल घाटाेळ, खजिनदारपदी बाळासाहेब बंदावणे, उपखजिनदारपदी प्रकाश निगळ यांची निवड केली अाहे.