आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारावी परीक्षेचा आज दुपारी 1 वाजता निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल बुधवारी (दि. २७) जाहीर होणार आहे. दुपारी वाजता विद्यार्थ्यांसाठी हा निकाल मंडळाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी राज्यात सुमारे १३ लाख विद्यार्थी पात्र ठरले होते. जून २०१५ पासून महाविद्यालयांत दुपारी वाजेनंतर गुणपत्रिकेची प्रत मिळण्यास सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालासंदर्भात शंका आहे, अशा विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी ते १५ जूनदरम्यान फेरतपासणीचे अर्ज करावेत. ज्या विद्यार्थ्यांना पेपरच्या फोटोकॉपी हव्या असतील, त्यांनी २७ मे ते १५ जूनपर्यंत मंडळाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. ऑनलाइन निकालांच्या प्रिंटआऊट घेऊन विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रिया करता येणार आहेत. त्यामुळे निकालांच्या प्रति मिळेपर्यंत थांबावे लागणार नाही.
सीबीएसई दहावीचा निकालही आज
सेंट्रलबोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. दुपारी १२ वाजेनंतर पुढील संकेतस्थळांवर हे निकाल पाहायला मिळतील. या परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये १३ लाख ७३ हजार ८५३ विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावर cbseresults.nic.in निकाल पाहायला मिळणार आहेत.
समुपदेशकांचे क्रमांक
के.आर. बावा ९४२३१८४१४१
प्रशांत पाटील ९७६७३०३०९०
सुनील आहेर ९४२३२५५३००
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन समुपदेशक
निकालासंदर्भात काही शंका असल्यास, हा निकाल जाहीर झाल्यापासून सहा दिवसांपर्यंत विद्यार्थी पालकांसाठी हेल्पलाइन सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०२५३-२५९२१४३ यावर संपर्क साधावा. निकाल https://mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होइल.
बातम्या आणखी आहेत...