आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात अाज बाप्पाला निराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशाेत्सव विसर्जन मिरवणुकीसह माेठ्या जल्लाेषात भावपूर्ण वातावरणात पारंपरिकपणे गुरुवारी (दि. १५) गणरायाला निराेप दिला जाणार अाहे. हजाराे घरगुती गणरायांबराेबरच सार्वजनिक मंडळांकडून ‘गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणरायाचे विसर्जन करण्यात येणार असून, त्यासाठीची पाेलिस प्रशासनाकडून सर्व सज्जता करण्यात अाली अाहे.

विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी वाकडी बारव, चौकमंडई, जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके मार्ग, महात्मा फुले मार्केट, बादशाह लॉज कॉर्नर, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोक स्तंभ, नवीन तांबट अाळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, परशुराम पूरिया रोडने कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण अशी जाऊन मूर्तींचे गाेदावरीत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर मिरवणुकीत सहभागी वाहने वगळता सर्व वाहनांसाठी दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंदी राहणार आहे. मंडळांनी त्यांचे रथ वाकडी बारवपाशी नंबर लावण्यास सुरुवात केली अाहे. यंदा गणेशाेत्सव मंडळांच्या संख्येतदेखील वाढ झाली असून, प्रस्तावित मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मिरवणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शनावर भर राहण्याची चिन्हे दिसत अाहेत. गणेशाेत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी अापल्या मंडळाचा रथ अधिकाधिक अग्रस्थानी राहावा, यासाठी सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या रथाला सजवून कालपासूनच रवाना केले अाहेत. तर, काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अाधी नंबर लावून वाकडीबारव येथेच रथाच्या सजावटीला प्रारंभ केला अाहे.
विसर्जनमिरवणुकीत निवडणूक रंग : काहीमान्यवर नेत्यांची मंडळे दरवर्षी त्यांच्या मंडळांतील ‘बुलंद’ कार्यकर्त्यांच्या फाैजेसह हा साेहळा माेठ्या उत्साहात साजरा करतात. त्यात कुणाचा डीजे माेठ्या ढणढणाटाचा, कुणाकडे सर्वाधिक ‘बेधुंद’ कार्यकर्त्यांची उपस्थिती इथपासून प्रत्येक बाबतीत या मंडळांमध्ये चढाअाेढ असते. त्यात यंदा निवडणुकीचा माेसम असल्याने कार्यकर्त्यांना खुश करण्याच्या त्यांच्या ‘तीर्थप्रसादा’ची मुबलक सज्जता करण्याला मंगळवारीच प्रारंभ करण्यात अाला अाहे. काही नवीन मंडळे अाणि त्या मंडळांचे प्रमुख ‘इच्छुक’देखील जय्यत तयारीतच विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...