आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Interview For Post Of Registrar To Health Science University

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आज मुलाखत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मंगळवारी विद्यापीठात 17 उमेदवारांची मुलाखत होणार आहे. विद्यापीठातीलच दोन उमेदवारांपैकी एकाची निवड होण्याची चर्चा विद्यापीठ वतरुळात आहे.विद्यमान कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. या पदासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाने अर्ज मागवले होते. अर्ज पाठवणार्‍या 30 पैकी 17 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या मुलाखती सकाळी 11 वाजेपासून होणार आहेत. विद्यापीठातील दोन अधिकार्‍यांमध्ये एकाला अधिकारी-कर्मचार्‍यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात असल्याने विद्यापीठातील वातावरण चांगले राहण्यासाठी या अधिकार्‍याच्याच निवडीची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येते.


वित्त अधिकार्‍यांचीही होणार निवड
वित्त विभाग प्रमुख पदासाठीही मंगळवारीच मुलाखती होणार आहेत. या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दोन वर्षांपासून उपकुलसचिव एन. व्ही. कळजकर यांच्याकडे आहे. मध्यंतरी शासनाने एका अधिकार्‍याची नियुक्ती केली होती; मात्र तो रुजू न झाल्याने विद्यापीठाने या पदासाठीही जाहिरात दिली होती.


घांची दावेदारी
अनुभवाच्या जोरावर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख डॉ. सुनील फुगारे व परीक्षा विभागाचे प्रमुख के. डी. गरकळ मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.