आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकरावीसाठी २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, आज शेवटची मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांना शनिवार(दि. १८ जून)पर्यंत अर्ज करण्याची संधी राहणार आहे. अकरावीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांसाठी शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत एकूण २५ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करण्यासाठी शनिवारी अखेरची मुदत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांच्या संख्येत वाढ होईल.

प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, ऑनलाइन नोंदणी मेरिट फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा असलेली शहरात ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात २० हजारांवर जागा उपलब्ध आहेत. शहरातील जागांसाठी एकूण २५ हजारांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात तब्बल ६५ हजार २८० जागा आहेत. मविप्र संस्थेची जिल्ह्यात ५४ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात १९ हजार ७३५ जागा आहेत. या सर्व महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. आतापर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेसाठी तब्बल २५ हजार २५७ मेरिट अर्ज दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना मेरिट फॉर्म भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२२जूनला पहिली गुणवत्ता यादी : अकरावीसाठीप्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे. २५ पर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया होईल. त्यानंतर २७ २८ रोजी दुसरी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर, २९ जून रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होईल.
बातम्या आणखी आहेत...