आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनासाठी सर्वत्र लगबग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दीपाेत्सवातील धार्मिक, अार्थिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाचा दिवस मानला जाणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठीची लगबग अाणि तयारी शनिवारपासूनच सुरू झाली हाेती. लक्ष्मीपूजनाला रविवारी (दि. ३०) दिवसभर मुहूर्त असल्याने नागरिकांना मुहूर्तासाठी फार कसरत करावी लागणार नाही.
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. लक्ष्मी ही फार चंचल असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते, असा समज आहे. त्यासाठी अनेक घरांमध्ये श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी अाणि व्यावसायिकांचे हिशेबाचे व्यवहार या साेहळ्यानंतरच सुरू होतात. पारंपरिक व्यावसायिकांचे नूतन वर्ष
लक्ष्मीपूजनापासूनच सुरू हाेते.

गाेरजमुहूर्ताला प्राधान्य : सायंकाळीपाटावर रांगोळी काढून त्यावर वस्त्र पसरवून घरातील धनधान्य, फराळ, दागदागिनेरूपी समृद्धी मांडली जाते. नवी केरसुणी विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून हळद-कुंकू वाहून पूजन केले जाते. गाेरज मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यासही प्राधान्य दिले जाते. त्याचबराेबर व्यापारी, व्यावसायिक बांधवांकडून सायंकाळच्या शुभ अाणि अमृत मुहूर्तांवरदेखील पूजन करण्याची प्रथा अाहे.

खरेसाठीसजला बाजार पान
दीपाेत्सवाला रंग भरू लागला असून, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दारापुढे रांगाेळ्या रेखाटून लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करण्यात अाली.

असे अाहेत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त
सकाळी ९.३० ते ११ (लाभ)
सकाळी ११ ते १२.३० (अमृत)
दुपारी २.१५ ते ३.३० (शुभ)
सायंकाळी ६.३० ते (शुभ)
रात्री ते ९.१५ (अमृत)

गाेरज मुहूर्त उत्तम
^चंचल लक्ष्मीलास्थिर करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा अाहे. मनाेभावे पूजन केल्यास त्यातून फलप्राप्ती निश्चितपणे हाेते. सामान्य नागरिकांनी सायंकाळी गाेरज मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यासही ते लाभदायक ठरते. -प्रदीप बाेरकर, गुरुजी
बातम्या आणखी आहेत...