आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थासंदर्भात आज मुंबईत आढावा बैठक,निधीसह इतर ठोस निर्णयांची अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वर्षभरावर आलेल्या सिंहस्थाच्या कामांबाबत अपवाद वगळता सर्वच विभागांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सिंहस्थाचा स्वतंत्र कक्षही सुरू झाला नसल्याने गुरुवारी (दि. 13) मुंबईत मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणार्‍या आढावा बैठकीत तरी स्पष्ट आदेश मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


सिंहस्थासाठी दोन हजार 378 कोटींचा अहवाल शासनाला सादर केला आहे. मात्र, त्याबाबत निश्चिती नाही. केंद्राकडूनही निधीची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने महत्त्वाच्या कामांसाठी पहिल्या टप्प्यात 350 कोटी रुपये दिले होते. त्याव्यतिरिक्त 200 कोटी रुपये वाढीव निधी देण्याचे आश्वासन शासनाने दिले. प्रत्यक्षात केवळ 350 कोटी रुपयांचीच तरतूद असून, 200 कोटींबाबतही सर्वच अनभिज्ञ आहेत. निधीच्या मंजुरीत वेळ जात असल्याने विविध विभागांना स्वत:चा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम व काही प्रमाणात पालिकेचीच कामे सुरू झाली आहेत. इतर विभागांनी दुर्लक्ष केले आहे. आचारसंहिता, पावसाळा लक्षात घेता यंत्रणेला कामे करण्यास अतिशय कमी वेळ मिळणार आहे.