आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांसाठी आज ‘स्वप्नसूर’ पर्वणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे शब्दसुरावटींवर येतात.. त्याला संगीताची साथ मिळते, तर दुसरीकडे त्या शब्दांवर कुंचला सर्रकन फिरत कधी सुलेखन तर कधी चित्राविष्कार घडवताे, ताेही त्या शब्दसुरांना साजेसा... ही अनाेखी अनुभूती रसिकांना साेमवारी ‘स्वप्नसूर’ या कार्यक्रमातून घेता येणार अाहे.
‘दिव्य मराठी’च्या चाैथ्या वर्धापनदिनानिमित्त अायाेजित उत्सवात रसिकांना सुरावटींवर नेणारा हा कार्यक्रम साेमवारी (दि. २९) सायंकाळी वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हाेणार अाहे. या संगीत साेहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या, संगीताच्या अनुषंगाने कलाकार रंगाविष्कार करणार अाहेत. तसेच, कॅलिग्राफीचीही मजा रसिकांना घेता येणार अाहेे. शैलेश लेले यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमात मंगेश पाडगावकर, शांताराम नांदगावकर, गुरू ठाकूर, संगीता जाेशी अशा कवी-गीतकारांच्या रचना विनय राजवाडे, अाशिष मुजूमदार, विजय गवांदे, चैतन्य अाडकर, सुबाेध साठे अाणि केदार-विभास अशा नव्या दमाच्या संगीतकारांनी स्वरबद्ध केल्या अाहेत. तर, कार्यक्रमाला स्वप्नजा लेले, हरीश वांगीकर अाणि अभिजित पाटणकर हे स्वरसाज चढवणार आहेत. याेगेश देशपांडे यांचे निवेदन रसिकांना एेकायला मिळणार अाहे.

प्रवेश सर्वांसाठी खुला
गीत,संगीत, चित्रकला, कॅलिग्राफी या सर्वच कलांचा अाविष्कार सगळ्यांना बघता यावा, या दृष्टीने हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला ठेवण्यात अाला अाहे. अर्थातच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. त्यामुळे रसिकांनी कार्यक्रमाच्या काही मिनिटे अाधी यावे, असे अावाहन करण्यात अाले अाहे.

चित्रकला आणि कॅलिग्राफी
एकीकडेगाणे अाणि दुसरीकडे त्या गाण्याला साजेसे चित्र, असा हा स्वर अन् कुंचल्याचा अनुभव रसिकांना घेता येणार अाहे. यात मुकुंद वेदपाठक हे चित्राकृती करणार असून, सुमित काटकर हे कॅलिग्राफीचा अानंद देणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...