आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नीट’ अाज; गैरप्रकार राेखण्यासाठी कडक नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मेडिकल बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (दि. ७) नीट अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीबीएसईने कडक नियमावली तयार केली असून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये पेन-पेन्सिलसह घड्याळही नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडही ठरवून देण्यात आला आहे. 
 
वैद्यकीयच्या मेडिकल बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी मेडिकल कॉलेज, तसेच डेंटल कॉलेजांसाठी ती घेतली जाते. मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही परीक्षा होणार असून देशभरात ११ लाख परीक्षार्थी प्रविष्ट हाेणार आहेत. २३ शहरांमध्ये ही परीक्षा होईल. रविवारी सकाळी १० ते दुपारी या वेळेत ही परीक्षा होणार आहे. बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. झूलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी या विषयांवर आधारित प्रश्न असतील. १८० प्रश्न त्यांना पर्याय असतील. ‘नीट’साठी नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 

गैरप्रकार थांबतील 
^नीटपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीबीएसईने तयार करण्यात आलेली नियमावली चांगली असून नव्या नियमांमुळे गैरप्रकार थांबतील. निगेटिव्ह मार्किंग असल्याने विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे लिहावीत. -प्रवीण गडसिंग, नीट परीक्षा मार्गदर्शक 

पेन-पेन्सिलसह घड्याळ नेण्यासही मनाई.. 
नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रावरच पेन पेन्सिल दिली जाणार आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार उघड झाल्याने सीबीएसईने यंदा कडक नियमावली केली आहे. कोणत्याही प्रकारचे लेखी साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल फोन, ब्लू टूथ, प्लास्टिक वस्तू, कॅमेरा, पाण्याची बाटली अशा वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. 

ड्रेसकोड, बूट घालण्यासही मनाई 
परीक्षासुरळीत पार पडण्यासाठी कडक नियमावली तयार केली असून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. मुलांसाठी कुर्ता, पायजमा आणि बुटांऐवजी हाफ शर्ट, जीन्स चप्पल घालावी लागेल. मुलींना कपड्यांना मोठ्या प्रकारची बटणे लावण्यास मोठ्या टाचेच्या सॅण्डल्स घालण्यास मनाई करण्यात अाली अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...