आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावला अाजपासून कांदा लिलाव पूर्ववत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज (दि. २१) चार दिवसांनंतर पूर्ववत सुरू हाेणार असल्याची माहिती सभापती जयदत्त हाेळकर यांनी दिली.
कांद्याच्या लिलावावेळी वांधा काढला जाताे, यावरून संचालक व्यापाऱ्यात शुक्रवारी (दि. १७) वाद झाल्यानंतर लिलाव ठप्प झाले होते. शनिवारी रविवारी याबाबत व्यापारीवर्गाच्या बैठका होऊनही त्यावर तोडगा निघू शकला नव्हता.

सोमवारी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त हाेळकर यांच्या दालनात व्यापारी संचालक सचिन ब्रह्मेचा, व्यापारी अाेमप्रकाश राका, नितीन जैन, कांतीलाल सुराणा, पुरुषाेत्तम चाेथानी, अजित भंडारी बाजार समितीचे सचिव बी. वाय. हाेळकर यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा हाेऊन या वादावर पडदा टाकण्यात अाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून कांदा लिलाव सुरू करण्यास सहमती दर्शविली. सभापती जयदत्त हाेळकर यांनी कांदा लिलाव सुरू असताना किरकाेळ वादावरून अचानक लिलाव बंद करणे चुकीचे अाहे. यापुढे असे करता येणार नाही. तसेच, शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे अाहे. किरकाेळ वादावर ज्येेष्ठ व्यापारीवर्गाने तातडीने ताेडगा काढून प्रश्न त्याच ठिकाणी साेडवायला हवा हाेता. लिलाव प्रक्रिया बंद करून काय साध्य झाले, यावर माेठी चर्चा झाली. उपस्थित व्यापारीवर्गाने सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात वाद उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली. लासलगाव व्यापारी असाेसिएशनने बाजार समितीला लेखी पत्र देऊन मंगळवारी शेतीमाल लिलावात व्यापारी सहभागी हाेणार असल्याचे कळविले. शेतकरीवर्गाने अापला कांदा विक्री करण्यासाठी प्रतवारी करून अाणावा, असे अावाहन सचिव बी. वाय. हाेळकर यांनी केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...