आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निकची आज पहिली गुणवत्ता यादी; उत्कंठा शिगेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पॉलिटेक्निक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने विहित मुदतीत वाढ करून संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी एआरसी सेंटरच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत संपली असून, सोमवारी ( दि. ६) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, दि. जुलै रोजी संचालनालयातर्फे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती करण्याची संधी ते जुलैदरम्यान होती. प्रवेश अर्ज भरण्याची वाढीव मुदतही संपुष्टात आली असून, आता दि. रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. नाशिक विभागात पॉलिटेक्निकच्या २५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी लाभल्याने मुदतीत वाढ करण्यात आली होती. १९ हजार ७२४ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज निश्चित झाले.
विद्यार्थ्यांचा कल झाला कमी
विभागात तंत्रनिकेतन महाविद्यालयांतून २०,७३६ अॅप्लिकेशन किटची विक्री झाली होती. त्यातील १९,७२४ प्रवेश अर्ज निश्चित झाले आहेत. विभागात २५ हजारांहून अधिक जागा असल्याने जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने प्रवेश अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली हाेती. त्यातही प्रवेश अर्जांची संख्या कमीच राहिली. त्यामुळे पाच हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
मास्टर ऑफ इंजिनिअरिंगची प्रवेशप्रक्रिया आजपासून
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि मास्टर अॉफ टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ साठी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, सोमवार( दि. ६) पासून प्रवेश अर्ज करता येणार आहे. यासाठी १२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in/me2015 या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. १३ जुलै रोजी प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर होणार असून, त्यानंतर दोन दिवस म्हणजेच १४ १५ जुलै रोजी एआरसी सेंटरच्या माध्यमातून दुरुस्ती करण्याची संधी राहणार आहे. तर, १६ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यानंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.