आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवलगांसाठी आज 'प्रपोज डे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रेम म्हणजे प्रेम असतं.. प्रेमाची अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी आज विविध माध्यमं उपलब्ध असली तरीही आपण जिच्यावर, ज्याच्यावर जिवापाड प्रेम करत असतो, अशा जिवलगाकडे मनातल्या भावना व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’.
"व्हॅलेंटाइन्स वीक'मधला हा दुसरा दिवस. तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते, तो हा दिवस रविवारी साजरा करण्यासाठी तरुणाईचं प्लॅनिंगही झालंय. "प्रपोज डे'चा हा अनुभव घेत प्रियकर किंवा प्रेयसीला मनातल्या भावना व्यक्त करत प्रेमाची आर्त साद घातली जाईल. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतं, ही भावनाच बदल घडवणारी असते. हा सुखद अनुभव मनामनांत फुलणार आहे.

‘प्रपोज’चासोशल फंडा ‘प्रपोज’करण्यासाठी पूर्वी वापरली जाणारी पारंपरिक माध्यमं काळाच्या ओघात मागे पडली. ‘प्रपोज’ करताना आता अनेक माध्यमांचा वापर केला जाऊ लागला आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे, सर्वांच्याच हाती असलेल्या मोबाइलवरचं व्हॉटसअॅप आणि फेसबुक. व्हॉट्सअॅपवरून आपल्या जिवलगाला प्रेमाची साद घालणारे फोटो, मेसेजेस एकमेकांना पाठवले जाताहेत. व्हॉट्सअॅपवरील "डीपी'ची जागादेखील प्रेमाचं प्रतीक असलेल्या गुलाबाच्या फुलांनी घेतलीय.