आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सबारवर आज नाशिकमध्ये चर्चासत्र, विविध क्षेत्रातल्‍या महिला मांडणार मते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यात डान्सबारवरील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला. राज्य सरकार या निर्णयाबाबत अनुकूल नाही. निर्णय जाहीर झाल्यापासून या विषयावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातल्या महिलांची याबाबत काय भूमिका आहे, यावर विचारविर्मश होण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे गुरुवारी (ता. 25) दुपारी 12 वाजता गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या ‘स्वगत’ सभागृहात महिलांसाठी चर्चासत्र होणार आहे.

शहरातील विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच नगरसेविका या वेळी उपस्थित राहतील. डान्सबार असोसिएशनच्या प्रतिनिधी गीता शेट्टी या खास मुंबईहून या चर्चासत्रासाठी उपस्थित राहणार आहेत. डान्सबारमुळे शहरातील वातावरणावर पडणारा प्रभाव, डान्सबारमधील स्त्रियांचे लैंगिक शोषण, बारमुळे वाढती गुन्हेगारी आदी बाबींबरोबरच बंदी कायम केल्यास बारबालांच्या पुनर्वसनासारखे निर्माण होणारे प्रश्न आदी विषयांवर या वेळी चर्चा होईल. कायदा काय सांगतो, प्रशासनातील व कायद्यांमधील त्रुटी वा सुधारणा आदी विषयांवरदेखील ऊहापोह होणार आहे. सर्व महिलांसाठी हे चर्चासत्र खुले असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे.


स्थळ : कुसुमाग्रज स्मारक (स्वगत सभागृह), गंगापूररोड. वेळ : दुपारी 12