आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सिक्युरिटीवर टंडन यांचे आज व्याख्यान , ‘जैन सोशल’, आयआयडीतर्फे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जैन सोशल ग्रुप नाशिक आणि आयआयडी नाशिक यांच्या वतीने रविवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर उत्तर प्रदेश हरियाणा पोलिसांचे सायबर युनिट सल्लागार रक्षित टंडन यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

व्याख्यानात स्मार्ट फोनचा स्मार्ट पद्धतीने उपयोग, सार्वजनिक वायफाय वापरातील सावधानता, सुरक्षित आॅनलाइन बँकिंग शाॅपिंग, मोफत अॅप्लिकेशनद्वारे माहितीची चोरी या महत्त्वपूर्ण विषयांवर टंडन मार्गदर्शन करतील. या व्याख्यानाचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, आयआयडीचे अध्यक्ष हेमंत दुगड, जैन सोशल ग्रुपचे सेक्रेटरी विजय लोहाडे, आयआयडी सेक्रेटरी तरन्नुम काद्री यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...