आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा निकाल आज संकेतस्थळावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 7) दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळावर समजणार आहेत. नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर तत्काळ माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याची प्रिंट विद्यार्थ्यांना काढता येईल. तसेच हा निकाल बीएसएनएल मोबाइलवरून एसएमएसद्वारेही उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 15 जूनला गुणपत्रक देण्यात येणार आहे. नाशिक विभागातून एक लाख 84 हजार 381 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, जिल्ह्यातून 82 हजार 143 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


येथे पाहा निकाल
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
www.sscresult.mkcl.org
एसएमएससाठी : BSNL MHSSC57766