आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ईद-उल-अज्हा’निमित्त आज सामूहिक नमाजपठण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदचा सण मंगळवारी (दि. १३) पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरातील ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाह मैदानावर सकाळी ९.४५ वाजता शहराचे खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन साहाब खतीब यांच्या नेतृत्वाखाली विशेष सामूहिक नमाजपठण करण्यात येणार आहे. शहरातील सोळा मशिदींतही नमाजपठण सकाळी ते वाजेच्या दरम्यान होईल.
‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. १२) संध्याकाळी घरांमध्ये विशेष गोड खाद्यपदार्थ तयार करून आरफाचे फातिहा पठण करण्यात आले. यानिमित्त विशेष फातेहाख्वानीचे आयोजन करण्यात आले होते. कुर्बानीचा धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पालिकेकडून वडाळागाव, जुने नाशिक परिसरात २०हून अधिक ठिकाणी तात्पुरत्या कुर्बानी केंद्रांना परवानगी दिली आहे. या अधिकृत कुर्बानी केंद्रांवरच जनावरांची कुर्बानी देण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले. सोमवारी ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाहची सफाई करण्यात आली. तसेच, पोलिसांकडून बॉम्बशोध पथकाने मैदानाची पाहणी केली. नमाजपठण होईपर्यंत ईदगाहवर सशस्त्र पोलिस पहारा राहणार आहे. बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन धर्मगुरूंसह धार्मिक संस्थांनी केले.

शुभेच्छा फलकांनी परिसर गजबजला
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीचा रंग यंदा सर्वच सण-उत्सवात दिसून येत आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिमबहुल भागांमध्ये काही इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ईदचे शुभेच्छा फलकही झळकविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एकप्रकारे अागामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुलच वाजविला जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...