आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी आज; उत्कंठा शिगेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा अर्धा टप्पा पार पडल्यानंतर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष आता सोमवारी (दि. २९) जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे. पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग या यादीनंतर सुकर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील तीन ते चार महाविद्यालयांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व महाविद्यालयांत प्रवेश खुले होणार असल्याचे दिलासादायक चित्र आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतरच कला वाणिज्यचे प्रवेश सर्वांसाठी खुले झाले होते. त्यामुळे तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी शहरातील ५१ कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान संयुक्त शाखा अशा एकूण २०,८६० जागा अाहेत. त्यातील १०,४१६ जागांवर प्रवेश निश्चित झाले अाहेत. अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीने उच्चांक गाठल्याने आता सोमवारी दुपारी वाजता तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.

व्यवस्थापन कोट्याची चाचपणी
अकरावीतीलप्रवेशाकरिताच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीचा उच्चांक कायम राहिल्याने तिसऱ्या गुणवत्ता यादीतही विज्ञान वाणिज्यसाठी ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत ‘कट ऑफ’ राहणार असल्याचा अंदाज अाहे. त्यामुळे ६० ते ७५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी व्यवस्थापन कोट्याचा आधार असल्याने त्याचीही चाचपणी सुरू झाली आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...