आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या १२२व्या तुकडीचा आज दीक्षांत साेहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२२व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ शनिवारी (दि. २७) सकाळी वाजता येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. दीक्षांत सोहळ्यानंतर १६३ नवीन उपनिरीक्षक पोलिस दलामध्ये सहभागी होणार आहेत.
पोलिस महासंचालक संजीव दयाल यांच्या उपस्थितीत हा दीक्षांत साेहळा हाेणार अाहे. या कार्यक्रमास पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दीक्षांत साेहळ्यासाठी सकाळी वाजता प्रमुख अतिथींचे आगमन, मानवंदना, परेड कमांडर शपथविधीची परवानगी, निशाण टोळीचे आगमन, शपथविधी निर्गमन, संचालक नाशिक यांचे अहवाल वाचन, बक्षीस वितरण, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री हे तुकडीस संबोधित करतील. निशाण टोळी राष्ट्रीय ध्वजास उपस्थितांसह सर्व अधिकारी मानवंदना देतील. परेड विसर्जनाने दीक्षांत सोहळ्याची सांगता होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक नवल बजाज, उपसंचालक रमेश घोराळे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...