आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतानमध्ये अाज विश्व मराठी साहित्य संमेलन, संजय अावटे संमेलनाध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन गुरुवारी भूतानच्या थिम्पूमध्ये रंगणार अाहे. पुण्याच्या शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने हे संमेलन अायाेजित करण्यात येते. पत्रकार संजय अावटे यांच्या अध्यतेखाली हाेत असलेल्या या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी, व्याख्याने, भाषणे, परिसंवाद या माध्यमातून मराठी भाषेचे मंथन हाेणार अाहे.

थिम्पू शहरात गुरुवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार अाहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता हरी नरके यांच्या हस्ते संमेलनाचे उद‌्घाटन हाेईल. या वेळी अावटेंसह भूतानचे शिक्षणमंत्री ल्युंपाे नाेर्बू वांॅगवूक, माजी शिक्षणमंत्री ल्यूंपाे ठाकूरसिंग पैडील, भाऊराजे जहागीरदार, श्यामसुंदर कानडे, चंद्रकांत शहासने, डाॅ. प्रसाद पिंपळखरे, अाणि सिद्धार्थ हे उपस्थित राहणार अाहे. उद््घाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीलेश गायकवाड करणार अाहेत. भूतानच्या अाजी-माजी शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार अाहे. त्यानंतर नरके मनाेगत व्यक्त करणार अाहे. अावटे यांचे अध्यक्षीय भाषण यावेळी हाेणार अाहे. त्यानंतरच्या चर्चासत्रात चंद्रकांत शहासने, प्रसाद पिंपळखरे, ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी अाणि सुशांत सांगवे सहभागी हाेणार अाहेत. तिसऱ्या सत्रात भूतानच्या स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार अाहे. चाैथ्या सत्रात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे हातभार लागले अाहेत, त्या सर्व स्थानिक सहकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. संमेलनाचा समाराेप करण्यात येईल. या वेळी प्रमाेद गायकवाड अाभार मानतील. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अरुंधती सुभाष करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...