आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठ्या "फ्लॉवर बुके'चा आज नाशिकमध्ये विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवकारयुवा ग्रुपच्या वतीने सर्वात मोठ्या "फ्लॉवर बुके'ची निर्मिती करण्यात आली असून, या बुकेचे गुरुवारी (दि. २८) उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याप्रसंगी संकलित होणारा निधी निराधार विद्यार्थ्यांसाठी दान केला जाणार अाहे.
गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे सकाळी वाजता प्रशासकीय अधिकारी, राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. "वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड‌्स'कडून या विक्रमाची नोंद केली जाणार असल्याने, नाशिकच्या वैशिष्ट्यांत आणखी एका घटनेची नोंद होणार आहे. सकाळी ते रात्री १० वाजेदरम्यान नाशिककरांना हा बुके पाहता येईल. लोखंडी ढाचावर उभारण्यात येणाऱ्या बुकेची निर्मिती आठवडाभरापासून सुरू आहे. त्यासाठी इको-फ्रेंडली फुलांची निर्मिती करण्यात आली आहे. काही प्रमाणात खऱ्या फुलांचाही या बुकेमध्ये वापर होणार आहे. या बुकेच्या निर्मितीसाठी हरीश लोढा, किरण खाबिया, आकाश जैन, हेमंत दुगड, अनिल नहार, संतोष मंडलेचा आदींचे सहकार्य लाभले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण अन‌् भव्य बुके साकारण्यासाठी लाेखंडी साचा तयार करण्यात अाला असून, नवकार युवा ग्रुपचे सदस्य गेला अाठवडाभरापासून इकाे-फ्रेंडली फुले तयार करीत अाहेत.
सुंदर साकार...