आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक यूथतर्फे अाज रांगाेळी स्पर्धा अन‌् गरबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक यूथ फाउंडेशनतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि. १५) दुपारी वाजता गंगापूररोड येथील अथर्व मंगल कार्यालयात युवती गृहिणींकरिता रांगोळी स्पर्धा आणि रास गरबा हाेणार आहे.
युवती गृहिणींच्या कलागुणांना संधी देत कौतुक व्हावे यासाठी ही स्पर्धा अाहे. यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी सायंकाळी वाजता होईल. स्पर्धेत पोट्रेट, संस्कार भारती या विषयांवर रांगोळी काढावयाची असून, प्रत्येक स्पर्धकाला अडीच तासांचा वेळ असेल. शहरातील प्रसिद्ध रांगोळीकार सोमेश्वर मुळाणे हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून बालकलाकार ओवी दीक्षित, सई मोराणकर, हिमगौरी आहेर-आडके, संजय सोनी, शैलजा ब्राह्मणकर उपस्थित राहतील. प्रथम बक्षीस येवला पैठणी असून, सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. माहितीसाठी स्वप्नील येवले (८४२१०८३०००), संदीप सिनकर (९८२२८१७२०५) यांच्याशी संपर्क साधावा.

रंगणाररास दांडिया : अनेकमहिलांना सार्वजनिक ठिकाणी गरबा रास खेळायला असुरक्षित वाटते. म्हणून फक्त मुली-महिलांकरिता गरबा रासचे आयोजन करण्यात आले अाहे. प्रवेशिका असलेल्यांना यात सहभागी हाेता येईल.
बातम्या आणखी आहेत...