आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाैचालयाचे अनुदान हडप केल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतेसाठीच्या कार्यक्रमांतर्गत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत महापालिकेने पहिल्या टप्प्यात सहा हजार याप्रमाणे शहरातील गरजू नागरिकांसाठी दिलेल्या अर्थसाहाय्याचा शाैचालय बांधकामासाठी वापर करणाऱ्या २९४ लाभार्थ्यांवर शौचालय बांधकामसाठीचे अनुदान हडप केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित संशयित लाभार्थ्यांवर फाैजदारी कारवाईसाठी महापालिकेच्या अाराेग्य विभागाने हालचाली सुरू केल्या अाहेत.
अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांना येत्या अाठ िदवसात वयक्तिक शौचालयाचे बांधकाम सुरू करण्याची तंबी िदली असून त्यानंतर कारवाई केली जाईल, असे पालिकेचे अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असून, त्यासाठी केंद्राकडून एका लाभार्थ्यासाठी १२ हजार रुपये याप्रमाणे वयक्तिक अनुदान दिले जाणार असून, त्यात पहिल्या टप्प्यात हजारांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत अाहे. महापालिका क्षेत्रात एकूण ७१७४ लाभार्थी असून, त्यांच्यापैकी ४२१७ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात अाले अाहे. त्यापैकी २४८८ लाभार्थ्यंाना महापालिकेच्या वतीने पहिला हफ्ता देण्यात आला अाहे. त्यातील १३९५ लाभार्थ्यांनी वयक्तिक शाैचालय पूर्ण केले असून, ६८८ लाभार्थ्यांची ही कामे सुरू अाहेत.

त्यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात हजाराचे अनुदान िदल्यावर त्याचा लाभार्थ्यांकडून वापरच झाला नसल्याचे समाेर अाले अाहे. बऱ्याच वेळा विचारणा झाल्यावर उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यावर पालिकेने अाठवडाभराची अंतिम मुदत िदली अाहे.

१०५९ लाभार्थ्यांची यादी रद्द
गटारनसणे, बँक खाती नसणे इतर कारणांमुळे १०५९ लाभार्थ्यांची िनवड रद्द केली अाहे. १७२९ लाभार्थ्यांचे बँक खाते नसल्यामुळे लाभ देता अालेला नाही. दरम्यान, तिसऱ्या यादीत ३९९९ लाभार्थ्यांचा समावेश असून, तपासणीसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे यादी पाठवली अाहे. त्यात सातपूर विभागाची यादी अाली असून, अन्य विभागाच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर प्रथम हफ्ता वर्ग हाेईल.
बातम्या आणखी आहेत...