आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: मुक्त विद्यापीठात ‘टॉयलेट’ घोटाळा; बांधली 3, पैसे आकारले 10 प्रसाधनगृहांचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत प्रसाधनगृहे बांधली तीन, मात्र प्रत्यक्षात पैसे आकारले 10 प्रसाधनगृहांचे. स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी दिलेली रक्कमदेखील लाखोंच्या घरात तर सुरक्षारक्षकांना बसण्यासाठीच्या बांधलेल्या दहा कक्षांसाठी तब्बल 40 लाख रुपये आकारण्यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारांची मालिका आणखीनच लांबत असल्याचे त्यामुळे स्पष्ट होत आहे. मात्र ही कामे ज्यांच्या अखत्यारीत येतात ते कार्यकारी अभियंता अाणि लेखा विभागप्रमुख यांनी मात्र ही सर्व प्रक्रिया नियमांनुसारच पार पडली असल्याचे दावे केले आहेत.

विद्यापीठाच्या कामकाजादरम्यान प्रत्येक शाखेत काहींना काही कामांच्या माध्यमांतून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येत असतांनाच त्यातून प्रसाधनगृह, स्वच्छतागृह अाणि विद्यापीठाच्या आवारात बांधण्यात आलेल्या सिक्युरिटी केबिन यादेखील सुटलेल्या नाहीत.

या सर्व बांधकाम आणि देखभालीमध्ये 30 लाखांचा अपहार दृष्टिपथात आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये अशाच रितीने अपहार झाल्याचे लक्षात येताच खुद्द कुलगुरूंनी यासंदर्भात संपूर्ण माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत असलेले स्वच्छतागृह अतिशय चांगल्या स्थिती असतानाही त्याच्या दुरुस्तीची कामे झाल्याचे दाखविण्यात आले. दुरुस्तीच्या या कामांमध्ये केवळ तीन युरिनल नवीन बसविल्या आणि 10 नवीन बसविल्याचे दाखवून पैसे घेण्यात आले. त्याचबरोबर सुरक्षारक्षकांच्या केबिन (सिक्युरिटी पोस्ट) बांधण्याचा खर्च साधारण एक लाखापर्यंत दाखविण्यात आला होता. मात्र, या केबिनचे काम झाल्यानंतर एका केबिनचे लाख रुपये या दराप्रमाणे पैसे घेण्यात आले. हे 40 लाख रुपये देखील बिनबोभाट संबंधितांना देण्यात आले.

पुढील स्लाइडवर वाचा.. अधिकारी म्हणाले... निविदा आणि मंजुरीनुसारच रक्कम अदा
बातम्या आणखी आहेत...