आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Toll Plaza Matter, Congress nationalist Congress Party Demands Resign Of Mla Kadam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोल नाका तोडफोडप्रकरणी काँग्रेस-राष्‍ट्रवादीचा मोर्चा, आमदार कदमांच्या राजीनाम्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील महिलांना शिवीगाळ करुन उद्दामपणाचे दर्शन घडविणा-या शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्याविरोधात शुक्रवारी जिल्ह्यात मोर्चा, रास्ता रोको आंदोलने करुन त्यांचा निषेध करण्यात आला. निफाडमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून कदम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन केला.

टोलनाक्यावर महिलांसमोर असभ्य वर्तन व शिवीगाळ करणारे आमदार कदम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी केली. आमदारांनी केलेल्या अरेरावीच्या निषेधार्थ निफाडमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर नायब तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. बनकर म्हणाले की, टोलनाक्यावर परिसरातील भगिनीच उदरनिर्वाहासाठी नोकरी करतात. त्यांच्याबाबत वापरलेली भाषा अशोभनीय असल्याने तालुक्याला मान खाली घालावी लागली. आमदार असूनही आपल्याला टोलनाक्यावर ओळखले नाही, हा त्यांचा बनाव आहे. यापूर्वीही त्यांनी तहसीलदार, दुय्यम निबंधक, पोलिसांवर दादागिरी केली आहे. आता तर त्यांनी नैतिकतेची हद्द पार केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि कदमांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा.

हे सर्व हप्त्यासाठी
या टोलनाक्यावर निफाड तालुक्यातील कोणालाही टोल भरावा लागत नाही. त्यामुळे कदम यांचे वाहन टोलसाठी अडविण्याचा प्रश्नच नाही. त्यांची ही दडपशाही हप्ता सुरू व्हावा, यासाठी आहे. महिलांबद्दल अश्लील वक्तव्य करणा-या कदम यांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी बनकर यांनी केली.

सरकारी अधिकारी मागताहेत बदल्या
आमदार कदम यांच्या अशाच अरेरावीला कंटाळून निफाडमधील शासकीय अधिकारी आता बदली मागू लागले आहेत. बाहेरून कोणताही चांगला अधिकारी येथे येण्यास धजावत नाही. गेल्या तीन वर्षांत तीन प्रांताधिकारी, सात तहसीलदार व तीन गटविकास अधिकारी बदलण्यात आले आहेत, याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.