आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांच्या खिशाला झळ: कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो महागला; 60 रुपये किलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोनेही ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. देशभरात टोमॅटोचा पुरवठा करणार्‍या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि गिरणारे येथील बाजारांत आवक कमी आहे. यामुळे प्रमुख शहरात टोमॅटो 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. औरंगाबादेत 30 ते 40 रुपये भाव आहे.

यंदा पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला प्रति क्रेट 800 ते 850 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहे. आवक घटल्याने पाकिस्तान, बांगलादेश, कोलकाता, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात टोमॅटो 60 ते 80 रुपये किलो झाला आहे. नाशकातून पाकिस्तानात दररोज सुमारे 400 मालट्रकची निर्यात होत असते. मात्र आता केवळ 40 मालट्रक (एका मालट्रकमध्ये 16 हजार किलो टोमॅटो) निर्यात होत आहेत. तर बांगलादेशमध्ये 25 ते 30 ट्रकऐवजी केवळ 7 मालट्रक टोमॅटो निर्यात होत आहे.