आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो वधारला तर कांदा घसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले आहेत. शहरातील बाजारात टोमॅटोचे किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो 60 रुपये, तर कांदा प्रतिकिलो 30 रुपये दराने विक्री होत आहे.

पिंपळगाव बाजार समितीत प्रतिकेट्र 1021 रुपये, तर नाशिक बाजार समितीत 951 रुपये प्रतिक्रेट दराने टोमॅटोची विक्री झाली. त्यामुळे ग्राहकांकडून मध्यम प्रतीच्या टोमॅटोला मागणी होत आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे निर्यात होणार्‍या टोमॅटोची मागणी एक आठवड्यापूर्वी घटली होती. मात्र, पुन्हा पाकिस्तानमधून मागणी वाढल्याने टोमॅटोचे दर वधारले आहेत. पिंपळगाव, गिरणारे, नाशिक येथील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची प्रतिक्रेट 800 ते 951 रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही टोमॅटोची 60 रुपये किलो झाले. मात्र, टोमॅटोकडे ग्राहकांनी दुर्लक्ष केल्याने विक्रेत्यांकडे टोमॅटो तसाच शिल्लक राहत आहे.

उच्च प्रतीचा टोमॅटो प्रतिकिलो 60 रुपये
किरकोळ बाजारात उच्च प्रतीच्या टोमॅटो 60 रुपये प्रति किलो, मध्यम प्रतीचा 40 रुपये प्रति किलो असून लसूण 80 ते 100 रुपये किलो, काकडी 25 ते 30 रुपये किलो आहे.

पाकिस्तानने बंद केलेल्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. निर्यातीत वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. गोपीभाई मनियार, टोमॅटो व्यापारी

आवक घटली
टोमॅटोच्या मागणीप्रमाणे आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. इतर राज्यांत टोमॅटोचे पीक आल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब महाले, टोमॅटो व्यापारी