आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडसे यांच्याबाबत उद्या घेणार मनसे निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसेला रामराम केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी जनतेवर निवडणूक खर्च लादणार नाही, अशी सबब पुढे करीत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या या पदाबाबत काय निर्णय घ्यायचा, या संदर्भात आमदार तथा प्रदेश सरचिटणीस वसंत गिते बुधवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय
घेणार आहेत.


कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाºया गोडसे यांनी राज ठाकरे यांनी आदेश दिला तरच राजीनामा देईन, असे जाहीर केले होते. त्यानंतर मात्र निवडणुकीचा खर्च जनतेवर लादला जाण्याचे कारण देत राजीनामा देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर गोडसे यांच्याबाबत पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घ्यायचा का याबाबत गिते हे ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. याच वेळी स्थानिक पातळीवरील बदलांबाबतही विचार होणार आहे.


सारे काही खासदारकीसाठी...
लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारीची संधी मिळणार नाही, या भीतीतूनच गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे किंवा डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. तसेच उमेदवारी मिळाली तरी, मनसे - राष्‍ट्रवादीत छुपी युती होऊन दगाफटकाही होण्याचा संशय त्यांना आहे, असे गोडसे समर्थकांचे म्हणणे आहे.