आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomorrow Meeting At Nashik For Shihatha Kumbhamela

सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी उद्या महापालिकेत बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थाची पूर्वतयारी म्हणून महापौर अँड. यतिन वाघ यांनी 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता महापौर दालनात साधू, संत आणि महंतांची बैठक आयोजित केली आहे. दीड वर्षांवर सिंहस्थ येऊन ठेपल्यानंतरही कोणतीही तयारी सुरु नसल्याने साधू-महंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेने सुमारे अडीच हजार कोटींचा सिंहस्थ कृती आराखडा तयार करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. मात्र त्यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही सुरु झालेली नसल्याने दिगंबर आखडा, चतु:संप्रदाय आखाडा यासह विविध आखाड्यांच्या महंतांनी जिल्हा प्रशासन आणि पालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेने ही बैठक घेऊन पूर्वनियोजनाकरीता साधू महंतांकडून सुचना मागविल्या आहेत. तपोवनातील साधूग्रामसाठी राखीव ठेवण्यात आलेली जागा अद्याप ताब्यात न घेतल्याने साधूग्राम उभे कसे करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, पालिकेच्या ताब्यात 54 एकर व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची जागा अद्याप ताब्यात नाही. साधूग्रामसाठी एकूण 300 एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र त्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही ठोस नियोजन केलेले नाही. संबंधीत संपूर्ण क्षेत्र नाविकास क्षेत्राखाली असूनही त्याठिकाणी अनेक बांधकामे उभी राहत आहेत. यामुळे हे सर्व बांधकामे रोखून ही जागा कायमस्वरुपी साधूग्रामसाठी आरक्षित करावी, अशी मागणी साधू-महंतांनी केली आहे.

साधुग्रामसाठी जागा घ्यावी
साधुग्रामसाठी 300 एकर जागेची गरज आहे. मात्र, यासंदर्भात गेल्या तीन सिंहस्थापासून आश्वासनेच दिली जात आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका याबाबत घेत नाही. यामुळे आधी जागा ताब्यात घ्यावी.
-महंत श्री कृष्णचरणदास महाराज, चतु:संप्रदाय आखाडा, पंचवटी