आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या रेडिअाेलाॅजी, साेनाेग्राफी केंद्र बंद, जुलमी कायद्याविराेधात राज्यभरात अांदाेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रत्यक्ष लिंगनिदान करण्याचे पाप कागदपत्रांतील किरकोळ त्रुटी या दोन्ही गोष्टींसाठी कायद्यात समान शिक्षा आहे. असा जुलमी कायदा बदलावा म्हणून गेली २० वर्षे शासन दरबारी केलेल्या अर्ज विनंत्या सरकारने विचारात तर घेतल्या नाहीच, उलट ‘आकडेवारीचा' देखावा उभा करता यावा म्हणून अधिकाधिक डॉक्टरांवर फॉर्ममधील किरकोळ चुकीसाठी फौजदारी खटले दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १४) राज्यव्यापी रेडिअाेलाॅजी अाणि साेनाेग्राफी केंद्र बंदची हाक देण्यात अाली अाहे.
कायद्यातील जाचक तरतुदींचा वापर शासकीय यंत्रणेकडून केवळ प्रामाणिक डॉक्टरांचा छळ करण्यासाठी केला जातोय. एखाद्या फॉर्ममधल्या एखाद्या किरकोळ चुकीसाठी निरापराध डॉक्टर तुरुंगात पाठवले जात आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात काम करणे आम्हाला यापुढे शक्य नाही. कारण अशाच एखाद्या किरकोळ चुकीसाठी आम्ही तुरुंगात गेलो तर आमच्यामागे आमच्या कुटुंबाचे काय, अशी चिंता सतावत असल्यानेच संघटनेच्या वतीने बंदचा पवित्रा स्वीकारण्यात अाला अाहे. जुलमी कायदा त्याची सूडबुद्धीने होत असलेली अंमलबजावणी याचा निषेध म्हणून आम्ही सर्व रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आमची सेवा सध्या स्थगित करत आहोत. गरज पडल्यास ती बेमुदत थांबवणे या पर्यायाचाही विचार आम्हाला करावा लागेल, असेही संघटनेचे अध्यक्ष डाॅ. सुशांत भदाणे, डाॅ. विजय बर्वे, डाॅ. मंजूषा कुलकर्णी, डाॅ. किशाेर भंडारी, डाॅ. नारायण विंचूरकर, डाॅ. लालेश नाहटा यांनी कळविले अाहे.
बातम्या आणखी आहेत...