आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये या अन् पर्यटनाचा अानंद घ्या, छगन भुजबळ यांचे अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये या आणि या परिसरातील विविध पर्यटनस्थळांचा आनंद घ्या. तुमच्यासाठी येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे आवाहन माजी पर्यटनमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी देशभरातील पर्यटकांना रविवारी केले.

महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्स अाणि ट्रॅव्हल एजंट्स् असाेसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘नाशिक टुरिझम कॉन्क्लेव्ह २०१५’ मध्ये बिझनेस टू बिझनेस मिटचा शुभारंभप्रसंगी देशभरातील टूर अाॅपरेटर्सला भुजबळ संबाेधित करीत हाेते. व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष संताेष मंडलेचा, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, नगरसेवक सचिन महाजन हाेते.

पर्यटन अानंद घ्या नाशिक शहर पर्यटन विश्वाच्या क्षितिजावर जगाच्या पाठीवर झपाट्याने विकसित हाेणारे महानगर आहे. अशा प्रकारे वेगाने विकास पावणारे नाशिक जगात साेळाव्या क्रमांकाचे, तर, महाराष्ट्रातील क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून, ते उत्तम पर्यटनस्थळ अाहे. येथे जाे येताे ताे येथील अाल्हाददायक वातावरण अाणि पर्यावरणाच्या प्रेमात पडताे. येथे भरणारा कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर ज्याेतिर्लिंग यामुळे येथील धार्मिक पर्यटन पूर्वीपासूनच जगप्रसिद्ध असून, पर्यटनाच्या विविध अंगांनी नाशिक एक उत्तम पर्यटन शहर अाहे, पर्यटकांसाठी अत्यंत दर्जेदार सुविधा येथे उपलब्ध असल्याने ‘नाशिकमध्ये या, पर्यटनाचा अानंद घ्या’ असे आवाहन छगन भुजबळ यांनी देश-विदेशातील पर्यटकांना रविवारी केले.

नाशिक परिसर सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी उपयुक्त असून, पूर्वीपासून धार्मिक कार्ये कुंभमेळ्यासाठी लाखाे पर्यटक, भाविक येथे येतात. शहराच्या चाळीस-पन्नास किलाेमीटर परिसरातील अनेक पर्यटनस्थळांसह नाशिकपासून जवळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, गंगापूर डॅम, शिर्डी, सप्तशंृगगड या धार्मिक, पर्यटनस्थळांशिवाय येवल्याची पैठणी ही येथील अाकर्षणे असून, येथून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर अाैरंगाबाद अाहे.

जलद अारामदायी प्रवासासाठी रेल्वे, सहापदरी, चारपदरी महामार्ग अांतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ येथे अाहे. या सर्वांचा उपयाेग पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी करण्याचे अावाहन करत पर्यटकांना नाशिकला घेऊन या, नाशिकमध्ये सर्वाेत्तम सुविधा अापणास देऊ, असे अाश्वासन भुजबळ यांनी टूर अाॅपरेटर्सला केले.नाशिकच्या ब्रँडिंगसाठी आयोजित कार्यक्रमानिमित्त तान संस्थेतर्फे शनिवारी गंगा-गोदावरीचे मान्यवरांच्या हस्ते सामूिहक पूजन करण्यात आले.

चारशे प्रतिनिधींचा बी टू बीमध्ये सहभाग
देशभरातूनअालेले अडीचशे टूर अाॅपरेटर्स, शहरातील हाॅटेल्सचे संचालक, बिल्डर्स, पर्यटनाशी निगडित व्यवसायांच्या स्टाॅल्सला भेटी देत हाेते. व्यवसायांच्या माहितीची देवाण-घेवाण गांभीर्याने सुरू हाेती. यातूनच शहरातील पर्यटन व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येतील, असे अाशादायी चित्रपाहायला मिळत हाेते.