आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डेमय रस्त्यांमुळे दोन महिलांची रिक्षातच प्रसूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव - रस्त्यावरील खड्डय़ांत रिक्षा आदळल्याने दोन महिलांची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना रविवारी नाशिक जिल्हय़ात घडल्या. या दोन्हीही महिलांना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची व बाळांची प्रकृती चांगली आहे.

आदिवासी हौसिंग सोसायटीतल्या संगीता संतोष निरभवणे या गरोदर होत्या. रविवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने संगीताला रिक्षातून तातडीने लासलगाव- निमगाव वाकडा रस्त्याने प्राथमिक आरोग्य कें द्रात नेण्यात येत होते. परंतु एका मोठय़ा खड्डय़ात रिक्षा आदळल्याने संगीताने रिक्षातच मुलाला जन्म दिला. रिक्षाचालक सुरेश झांबरे यांनी तातडीने तिला निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य कें द्रात दाखल केले. दुसरी अशीच घटना रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. आंबेगाव (ता. येवला) येथील सविता महेंद्र गिते या रिक्षातून याच दवाखान्यात जात होत्या. परंतु, खराब रस्त्यामुळे लासलगावजवळ रिक्षातच त्यांची प्रसूती होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. रिक्षाचालकाने त्यांना निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

आंदोलनानंतरही दुर्लक्ष
लासलगाव- निमगाव वाकडा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी अनेक दिवसांपासून आहे. शिवसेना व भाजपने रस्त्यांवरील खड्डय़ांत वृक्षारोपण करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, त्याचाही परिणाम झाला नाही.

माता व बालके सुखरूप
सकाळी 8 व दुपारी 12 वाजेदरम्यान दोन महिलांची रिक्षातच प्रसूती झाली. तातडीने उपचार झाल्याने माता व बालके सुखरूप आहेत. डॉ. मनीषा वाघ, वैद्यकीय अधिकारी