आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Town Planning Joint Director Of Corporation Shende Transfer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेचे नगररचना सहसंचालक शेंडे यांची तडकाफडकी बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहसंचालक विनय शेंडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, नाशिक येथेच नगररचना मूल्यमापन विभागाचे सहायक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगररचना विभागातील अनेक गैरप्रकारांना शेंडे यांनी चाप लावल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी मोठा गट कार्यरत होता. नगररचना विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर शेंडे यांचा बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट आदी व्यावसायिकांशी वाद झाला होता. यापूर्वी नगररचना विभागामधील पूर्वाश्रमीच्या अधिकाऱ्यांनी अनेक नियम सोयीने डावलले, मात्र आपल्या कारकीर्दीत तसे करणार नाही, अशी भूमिका शेंडे यांनी घेतली होती. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून शेंडे जाणूनबुजून नियमांची आडकाठी आणतात, असा आरोप करण्यात येत होता. दरम्यान, शेंडे यांच्या बदलीसाठी नगररचना विभागाच्या राज्यमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या गेल्या होत्या. मध्यंतरी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शेंडे यांना खंबीर साथ दिल्यामुळे त्यांच्या बदलीची शक्यता मावळली होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अचानक बदलीची चर्चा पसरली. शेंडे हे दहा दिवसांच्या रजेवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बदलीसाठी राजकीय लॉबीचे प्रयत्न
शेंडेयांच्या बदलीसाठी एका मंत्र्यापासून ते आमदार महापालिकेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत अशा सर्वांनी जोर लावल्याची चर्चा आहे. एकूणच बदलीचा हा विषय पालिकेमध्ये चांगलाच चर्चेचा ठरला होता.