आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीम डॉक्टर’ बनून शिखर सर, हिमालयातील गिर्यारोहणाचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकरोडला गत दोन वर्षांपासून इएनटी सर्जन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शिरीष भालचंद्र घन यांनी 16 जणांच्या ट्रेकिंग पथकात ‘टीम डॉक्टर’ म्हणून थेट स्टोक कांगरीचे शिखर सर करण्याची किमया साधली आहे. उणे 15 डिग्री तपमान आणि समुद्रसपाटीपासून 18 हजार फूट उंचावर असलेले हे शिखर सर केल्याची अनुभूती अवर्णनीय असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

इंडिया हाइक्स या वेबपोर्टलशी संपर्क साधून डॉ. घन यांनी स्टोक कांगरी मोहिमेच्या तारखांची माहिती मागितली. संबंधित संस्थेने त्यांचा अनुभव आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव पाहून त्यांना ‘टीम डॉक्टर’ म्हणून जाण्याची विनंती केली. त्यानुसार, 2 चेक प्रजासत्ताक, 1 ऑस्ट्रियन आणि 13 भारतीय नागरिकांसमवेत डॉ. घन यांनी लेहपासून 1 सप्टेंबरला प्रयाण केले. हाडे गोठविणार्‍या थंडीत आणि 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असताना या पथकाने शिखर सर केले.

गिर्यारोहणासह व्यवसायाचाही उपयोग
मी तब्बल 25 वर्षांहून अधिक काळापासून गिर्यारोहण करीत आहे. मात्र, एकीकडे स्वत: गिर्यारोहणाचे दिव्य करतानाच वैद्यकीय व्यवसायाचे कर्तव्यही पार पाडण्याची संधी या ट्रेकमुळे मिळाली. त्यामुळे भविष्यातही अशाच प्रकारच्या कोणत्याही ट्रेकला ‘टीम डॉक्टर’ म्हणून जाण्यास प्राधान्य देणार आहे. - -डॉ. शिरीष घन, नाक, कान, घसा तज्ज्ञ आणि हौशी गिर्यारोहक