आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनाही कर्ज; अपात्रतेच्या निकषात ट्रॅक्टर नाही, ते गरजेचे वाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचावी यासाठी राज्य शासनाने पात्रतेचे काटेकोर निकष जाहीर केले. त्यातील वाहनाच्या निकषासंदर्भात शेतकरी, बँकांत संभ्रम आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे शासन निर्णय म्हणतो. यात ट्रॅक्टरचा समावेश नाही असे स्पष्टीकरण सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिले.

कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या निकषांतील क्रमांक चा निकष म्हणतो, ‘ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती (या शासन निर्णयासाठी कुटुंब या शब्दप्रयोगाचा अर्थ पत्नी, पती, आई, वडील, मुलगा, विवाहित मुलगी सून असा आहे)’ अशा शेतकऱ्यास तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ते कर्जमाफीपासून वंचित राहणार का, असा संभ्रम आहे.

यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले, ट्रॅक्टर हे चैनीचे वाहन नाही तर शेतकऱ्याच्या गरजेचे साधन बनले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निकषात अभिप्रेत चारचाकींमध्ये ट्रॅक्टर नाही. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीमालाच्या वाहतुकीसाठी जुनी वाहने कमी किमतीत विकत घेतात, त्यांनाही या अटीमुळे कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, असा आरोप सुकाणू समितीचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. मात्र, कुणालाही वंचित ठेवण्याची सरकारची भूमिका नाही, गरजू शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचावा या हेतूने हे काटेकोर नियोजन असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...