आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर बनला यांत्रिक शेतीचा मानबिंदू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रत्येक शेतकरी आधुनिकतेची कास धरू लागला आहे. शेती व्यवसायात यांत्रिक शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यातून प्रत्येक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहे. या संक्रमणावस्थेत यांत्रिक शेतीचा मानबिंदू ठरला तो ट्रॅक्टर.
शेतक-यांच्या अंगणात दिसणा-या खिल्लारी बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामे पारंपरिक पध्दतीने करण्यात जाणारा वेळ व त्यासाठी लागणारे कष्ट शेतक-यांना परवडणारे नाहीत. बदलत्या काळात कमी कमी वेळेत जास्तीतजास्त काम करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून साकार झाले. त्यामुळे ट्रॅक्टर शेतक-यांचा खरा मित्र संबोधला जात असून, त्याद्वारे शेतीची मशागत करण्याकडे शेतक-यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लहानशा खेड्यातही छोट्या शेतक-याच्या दारापुढे ट्रॅक्टर दिसण्याचे कारणही यांत्रिक शेतीला दिले जाणारे प्राधान्य हेच आहे. उन्हाने तप्त झालेली कडक जमीन नांगरता नांगरता महिनाभराचा कालावधी शेतक-यांना लागत होता. जमिनीचा पोत कडक असेल तर चार बैलांनी नांगरणी केल्याशिवाय शेतक-याला गत्यंतर नव्हते. खाचखळग्यांची शेती सपाट करण्याचे कामही तेवढेच वेळखाऊ होते. शेतक-यांना यासाठी मोठे कष्ट उपसावे लागत होते. हे चित्र इतिहास बनले आहे. ट्रॅक्टरने शेती व्यवसायात मोठा बदल घडवून आणला आहे.
घराघरासमोर ट्रॅक्टर
शेतक-यांच्या घराघरासमोर ट्रॅक्टर उभा दिसल्यास सधन व आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी अशी बिरुदावली सहज मनात येऊन जाते. खेड्यापाड्यात, डोंगर कपा-यात ट्रॅक्टरचा घुमलेला आवाज शेतक-यांच्या मनावर राज्य करू लागला आहे. हजार लोकसंख्येच्या लहानशा खेड्यातही शंभरावर ट्रॅक्टर आढळून येतात.
बहुउपयोगी यंत्र - साधा नांगर, पलटी नांगर, पळी नांगर अशी यंत्रे जोडून शेतक-यांना हवी त्या प्रकारात नांगरणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोटर, फण, फळी, पेरणी ही यंत्रे जोडून ट्रॅक्टरद्वारे बहुपर्यायी कामे करून घेतली जातात. जमीन सपाटीकरणासाठी फळी, तात्पुरत्या मशागतीसाठी फण व पेरणीसाठी पेरणी यंत्र जोडून कामे केली जातात.
शेतीसाठी बहुपयोगी - मेसी फर्ग्युसन 241 : 12 वर्षांपासून वापरत आहे. वैशिष्ट्ये :- पॉवरफुल पॉवर स्टेअरिंग, मशीन, पॉवरफुल, लोडला कोणतीच अडचण नाही. पिकअप चांगला तसेच ‘लक्ष्मी ट्रॅक्टर्स’ यांची सर्व्हिस चांगली आहे. तसेच सर्व त्यांच्याकडून मिळते. घरी येऊन सर्व्हिसिंग देतात. तीन वर्षांची गॅरंटी. मेसि फर्ग्युसन ट्रॅक्टर वॉरंटी नाही तर गॅरंटी देतो. - विलास निवृत्ती बंदावणे, गिरणारे, ता. जि. नाशिक., मो.: 9921936986
शेतक-यांचा सच्चा साथी - नाशिकचे अधिकृत डिलर लक्ष्मी ट्रॅक्टर्स यांच्याकडून खरेदी केले. मेसी फर्ग्युसन 10.35 जे सिरीज मागील दोन वर्षांपासून ट्रॅक्टर वापरत आहेत. नांगर, फन, ट्रॉली या सर्व कामांस उपयोगी व तसेच लक्ष्मी ट्रॅक्टर्स यांची सर्व्हिस चांगली आहे व घरी येऊन करतात. टेक्नोलॉजी चांगली आहे, अ‍ॅव्हरेज चांगला, बाकी ट्रॅक्टर्सला वॉरंटी येते. टॅफे मेसी फर्ग्युसन गॅरंटी देते 3 वर्षे. मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर वॉरंटी नाही तर गॅरंटी देतो. - मधुकर तुकाराम वडजे, रा. मडकेजाम, ता. दिंडोरी, जि. नाशिक. मोबाइल- 9730118725
शेतक-याचा मित्र - मेसी फर्ग्युसन 10.35 जे सिरीज मागील दोन वर्षांपासून ट्रॅक्टर वापरत आहे. नांगर, फन, ट्रॉली या सर्व कामांस उपयोगी व तसेच लक्ष्मी ट्रॅक्टर्स यांची सर्व्हिस चांगली आहे व घरी येऊन करतात. टेक्नोलॉजी चांगली आहे, अ‍ॅव्हरेज चांगला, बाकी ट्रॅक्टर्सला वॉरंटी येते. टॅफे मॅसी : फर्ग्युसन गॅरंटी देते 3 वर्षे. टॅफे मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर वॉरंटी नाही तर गॅरंटी देतो. आॅर्चिड प्लस : द्राक्ष बागेचा राजा.
बाळासाहेब पोपटराव जाधव, रा. वरवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. मोबाइल- 8275567434.
अ‍ॅव्हरेज इतर ट्रॅक्टरपेक्षा चांगले- मी स्वत: आयशर मागील 12 वर्षांपासून वापरत आहे. आत्तापर्यंत 3 आयशर वापरले. गावात 40-50 ट्रॅक्टर आहे. खास वैशिष्ट्य :- 1) मशीन चढ-उतारावर उठत नाही. 2) रोटाव्हेटर व मळणी यंत्राला नंबर 1 प्रतीचे आहे. 3) डिझेल अ‍ॅव्हरेज इतर ट्रॅक्टरपेक्षा खूप चांगला आहे. हा अनुभव गेल्या 12 वर्षांचा आहे. तसेच कृषिसेवा ट्रॅक्टर्स यांची सर्व्हिस अत्यंत चांगली मिळत आहे. - संजय बाबूराव गाडगे, पिंपळणारे, ता. दिंडोरी, जि. नाशिक. मोबाइल- 9823686426
आंतरमशागतीची समस्या सुटली - सध्याच्या परिस्थितीत शेतक-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये प्रामुख्याने आज सर्वात मोठी ज्वलंत समस्या म्हणजे मजुरांची उपलब्धता. प्रसंगी जादा दर देऊनही मजूर मिळणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी अंगद डिझेल दत्त - ६ एच.पी.चे मशीन खरेदी केले. माझ्याकडे 25 एकर उसाची लागवड केली असून, आंतरमशागतीची सर्वात मोठी समस्या मी या यंत्राव्दारे सुलभ केली. उसाची सध्याची लागवड 3 ते 4 फुटांवर असून, भविष्यात ती 5 फुटांवर येणार आहे. या मशीनसोबत नांगर, रोटावेटर, कल्टीव्हेटर, पेरणीयंत्र, पाण्याचा पंप, स्प्रे पंप तसेच 2.5 के.व्ही.ए.चे अल्टरनेटर चालते. रोटावेटरची रुंजी गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करता येते. वाफश्यावरील जमिनीत हे यंत्र खूपच सुलभ चालते, त्याचप्रमाणे वजनाला हलके व व्हायब्रेशन नसल्यामुळे चालवणा-याला त्रास होत नाही, महिलासुध्दा चालवू शकतात. डिझेलचा अत्यल्प खर्च व अनेक सुविधांमुळे मी माझी शेती आधुनिक पद्धतीने व यांत्रिकीकरणाने करू शकतो, असा विश्वास वाटतो. शेतक-यांसाठी अंगद डिझेल दत्त वरदान ठरेल. हे मशीन मी नाशिक येथुन सा. स. मोटर्स लि., व्दारका, नाशिक येथून घेतले. पुंजाराम संतु काकड, मु.पो. दारणासांगवी, ता. निफाड, जि. नाशिक. मोबाइल- 8805637269