नाशिक - राज्य सरकारने अादेश देऊनही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तपासणी वसुली नाके हटविले नसल्याचा अाराेप व्यापारी सातत्याने करत अाहेत, तशा तक्रारीही व्यापारी संघटनेने संंबंधितांकडे केल्या अाहेत. या नाक्यांच्या अाडून व्यापाऱ्यांची अडवणूक केली जात असून, सरकारचे कायदे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा अाराेप काही व्यापाऱ्यांनी केला.
बुधवारी पेठराेडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर समितीच्या कर्मचाऱ्यांनी माल घेऊन अालेल्या गाड्या अडवून कागदपत्रे मागितल्याने व्यापाऱ्यांनी अाक्षेप घेतला हा वाद थेट पंचवटी पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहाेचला. येथे कर्मचारी व्यापारी जमा झाल्यानंतर शेवटी काही संचालकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाजार सेस वसुलीवरून सध्या नाशिक बाजार समिती अाणि घाऊक धान्य-किराणा व्यापारी संघटना यांच्यात सुंदाेपसुंदी सुरू अाहे. सहकारमंत्र्यांपर्यंत हा वाद पाेहाेचला असून, दुहेरी बाजार सेस वसुल करू नये, याबाबतचे अादेशच त्यांनी बाजार समितीला िदलेले अाहेत. असे असतानाही बाजार समितीकडून अशी वसुली सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार व्यापारी करत अाहेत.
पाेलिस चाैकीचा झाला नाका
बाजारसमितीमधील सुरक्षाव्यवस्था अबाधित राहावी यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अडीच लाख रुपये एकत्रित करून ही पाेलिस चाैकी उभारली होती. मात्र, या चाैकीचा वापर बाजार समितीकडून तपासणी नाक्यासारखा सुरू असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार अाहे.
जिल्हा उपनिबंधकांकडे जाण्याचा सल्ला
हा प्रश्न जिल्हा उपनिबंधकांच्या अखत्यारित सुटणारा अाहे. त्यामुळे अाम्ही दाेन्ही पक्षांना त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला - दिनेश बर्डेकर, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक.
चर्चा करून याबाबत संपूर्ण माहिती घेताे
मी दिवसभर पुण्यात बैठकीत व्यस्त हाेताे. त्यामुळे याबाबत काहीच माहिती नाही. तत्काळ संबंधितांशी चर्चा करून माहिती घेताे. -नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक.
बाजार समितीच्या पेठराेड यार्डवरील मुख्य प्रवेशव्दारावरील पाेलिस चाैकीत बसलेल्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी व्यापाऱ्याची गाडी अडवली. कागदपत्रांची मागणी केली असता, अशी कागदपत्रे देणे कायदेशीर नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी याला विराेध केला पाेलिसांत लेखी तक्रार केली. कर्मचारीही माेठ्या प्रमाणावर एकत्र अाले. मात्र, काही संचालकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण तूर्तास मिटल्याचे सूत्रांनी सांगितले.