आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात एलबीटीविरोधात पुन्हा बंदची हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जे राजकीय पक्ष व्यापा-यांना एलबीटीप्रश्नी समर्थन देऊन हा कर हटवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत, त्यांना आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत व्यापा-यांनी मतदान करू नये, असा आदेश ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी रविवारी व्यापा-यांना दिला.


सरकारला जाग यावी यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीचे दोन दिवस 15 व 16 जुलैला राज्यभर व्यापार बंद आंदोलन छेडण्याची घोषणाही त्यांनी केली. जाचक एलबीटी कर कायद्यातील तरतुदी पाहता अधिकारी धमक्या देऊन व्यापा-यांकडून पैसे उकळतील त्याची सुरुवात नाशिकमध्ये सुरू झाली आहे. सांगली महापालिकेत एलबीटी लागू देणार नसल्याचे सांगणा-या आर. आर. पाटील यांच्याच सरकारने हा कर लावला असल्याने त्यांनी पहिल्यांदा सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहन फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी केले.