आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक मनपाच्या एलबीटी नोटिसांना व्यापारी देणार उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणार्‍या 1150 व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्यानंतर आता व्यावसायिकही त्याला कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. काही व्यावसायिक पालिकेला कर भरण्यास तयार असले तरी तो एलबीटी स्वरूपात न भरण्याची त्यांची भूमिका आहे. कायदेशीर हक्क ठेवून करभरणा करण्याच्या तयारीत हे व्यापारी आहेत.

व्यावसायिकांनी एलबीटी भरणा करावा, यासाठी प्रबोधनासारखे विविध प्रकार मनपाने अवलंबले. मात्र, व्यापारी महासंघ आणि फामच्या नेतृत्वाखाली एलबीटीला विरोध करणार्‍या व्यापार्‍यांनी आंदोलने करीत सरकारचे लक्ष वेधले. व्हॅटमधून एक टक्का कर वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, सरकारकडून काही किरकोळ बदल वगळता एलबीटी रद्द करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे, जकातीच्या तुलनेत एलबीटीमध्ये महापालिकेचे उत्पन्न घटत असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. त्यामुळे आता महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.