आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे बुधवारी (दि. १५) जयंती साजरी करण्यात येणार आहे. शहर परिसरातील सामाजिक, राजकीय मंडळांकडून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला अाहे. 
 
शहर परिसरात राजकीय पक्षांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १५) वाकडीबारव ते रामकुंडदरम्यानचा मार्ग दुपारपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. मिरवणुकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, तसेच गर्दी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे. 
 
असा असेल मिरवणूक मार्ग : हीमिरवणूक वाकडीबारव येथून जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, मेनरोड, धुमाळ पाॅइंट, महात्मा गांधी रोड, सांगली बँक सिग्नल, स्वामी विवेकानंद रोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुरामपूरिया रोडने रामकुंड परिसरात जाईल. या मिरवणूक मार्गावरील वाहतूक बुधवारी दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद असणार आहे. 
 
शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे बुधवारी निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजावरून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बस पंचवटी डेपाेतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बस इतर सर्व वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर अन्य ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलावरून जातील. 
बातम्या आणखी आहेत...