आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक विभागाची धडक कारवाई: एका महिन्यात 21 हजार केसेस, तब्बल 50 लाखांचा दंड वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत नोव्हेंबरमध्ये २० हजार ८६३ केसमध्ये ४५ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक महसूल गोळा करण्यात नाशिक पोलिस आयुक्तालयाचा क्रमांक लागला आहे.

 

सुरक्षित नाशिक अभियानाअंतर्गत शहरात वाहतूक विभागाची कारवाई सुरू आहे. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. हेल्मेटसक्ती, नो पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. कारवाईचा धसका घेत बहुतांश दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत आहेत. कार चालवताना सीट बेल्ट लावणाऱ्या वाहनांसह नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

 

या नियमांचे उल्लंघन केल्यास होते कारवाई
वाहनपरवाना नसणे, काचांना काळी फिल्म, दूरवर लोडेड वाहतूक, रहदारीस अडथळा निर्माण करणे, फ्रंटसीट, सीट बेल्ट, कागदपत्र बाळगणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, नो पार्किंग, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

 

यापुढेही कारवाई...
दंडात्मक कारवाई होत असल्याने बहुतांश वाहनचालक नियमांचे पालन करत आहेत. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे. यामुळे शहराची नवी ओळख निर्माण होईल.
- लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त

बातम्या आणखी आहेत...