आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलराेड भाजीबाजाराने गाठले कारागृहाचे टाेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - शहरातील सर्वाधिक रहदारीच्या बिटकाे ते दसक दरम्यानच्या जेलराेड रस्त्यावरील भाजीबाजार हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालला अाहे. महापालिका अतिक्रमण विराेधी पथकाच्या दुर्लक्षामुळे के. एन. केला शाळेपर्यंत थांबलेल्या बाजाराने अाता कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंतचे टाेक गाठले अाहे. फुटपाथएेवजी रस्त्यावर बसणारे विक्रेते खरेदीदारांच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली अाहे.
जेलराेड रस्त्यावर खासगी महापालिकेच्या २० पेक्षा अधिक शाळा दाेन महाविद्यालये अाहेत. तसेच, करन्सी नाेट प्रेससह पारेषण कंपनीचे कार्यालय अाहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसकडे जाणारा मार्ग जेलराेड रस्त्याला जाेडणारा अाहे. त्यामुळे सकाळी, दुपारी सायंकाळी या रस्त्यावरील विद्यार्थी, कामगार इतर नागरिकांच्या वर्दळीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त हाेते. त्यातच रस्त्यावर एका बाजूला थाेरात पेट्राेलपंपापासून सुरू झालेला भाजीबाजार मध्यवर्ती कारागृहापर्यंत वाढल्याने ताजा भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करून भाजीपाला खरेदी करतात. रस्त्यावरील वर्दळ वाहतुकीला अडथळा ठरणारा भाजीपाला, रस्त्यातील वाहनांमुळे अनेक अपघात हाेत अाहेत.

दरम्यानच्या काळात भाजीपाला स्थलांतरासाठी महापालिकेने पावले उचलली हाेती. नगरसेवक पवन पवार यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या जागेत भाजीपाला स्थलांतरित हाेऊन काही दिवस बाजारदेखील भरला हाेता. मात्र, श्रेयाच्या वादात हा भाजी बाजार पुन्हा एकदा रस्त्यावर अाला. त्यानंतर महापालिका अतिक्रमणविराेधी पथक, महापालिका, वाहतूक शाखा पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे बाजार वाढत जाऊन अाता त्याने कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंतचे टाेक गाठले अाहे. त्यामुळे निष्पापांचे बळी जात अाहेत.

केवळ चिरीमिरीसाठी...
इंगळेनगर चाैकात अतिक्रमण रहदारीमुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला अाहे. अतिक्रमणविराेधी पथकाने चिरीमिरीसाठी नागरिकांचा जीव धाेक्यात घालू नये. भय्या बाहेती, सामाजिक कार्यकर्ते

अवजड वाहतूक बंदीचे पालन हाेण्याची मागणी
जेलराेड रस्त्यावरून अवजड वाहतुकीस असलेल्या बंदीचे काटेकाेर पालन व्हावे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांना मागे बसण्यास लावून खरेदीसाठी रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत अाहे.