आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संततधारेने वाहतूक व्यवस्था विस्कळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावासामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी विभागात असलेल्या अनुभवी वरिष्ठ अधिकारी कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहतूक विभागात सहायक आयुक्तांसह सात अनुभवी वरिष्ठ निरीक्षक असूनदेखील हे अधिकारी अपेक्षित महसूल गोळा करण्यास वाहतूक व्यवस्था सुधारण्यास साफ अपयशी ठरत आहे.
शहर वाहतूक शाखेत काम करण्यास नाराज असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांनी काहीच नाही म्हणून विभागात बदली करून घेतली. मात्र, या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहतूक विभागात महसुलातही घट झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. सात वरिष्ठ अधिकारी असूनदेखील या अधिकाऱ्यांच्या प्रत्येकी १० ते २० केस होत असल्याने या तटपुंज्या महसुलामुळे वाहतूक विभागाचा इंधनाचा खर्चही भरून निघत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. तत्कालीन सहायक आयुक्त देवीदास पाटील यांच्या कार्यकाळात अवघ्या ८० दिवसांत सुमारे हजार केस आणि सव्वा कोटीचा महसूल शासनास प्राप्त झाला होता. मात्र, दोन महिन्यांपासून या महसुलात घट झाली आहे. शासनाच्या तिजोरीत अवघे काही लाखांचा भरणा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

अधिकारी हतबल
वाहतूक विभागाचे सहायक अायुक्त पंधरा दिवसांनी सेवानिवृत्त होत आहेत. वाहतूक शाखेचा अनुभव नसल्याने तेदेखील या अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यास हतबल झाल्याचे निदर्शनास येत आहे.

वाहनासाठी अट्टहास
वाहतूक शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांना शासकीय वाहन दिले अाहे. विभागात सात निरीक्षकांना सात वाहने आहेत. मात्र, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांना कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवर कारवाईसाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...