आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुना ओझर जकात नाका वाहतूक बेट देतंय अपघाताला निमंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्गावरील जुना ओझर जकात नाका येथे बनवण्यात आलेल्या वाहतूक बेटामुळे अपघात घडत असल्याने हे धोकेदायक बेट काढण्याची मागणी आडगावच्या नागरिकांनी केली आहे. वाहतूक बेटाच्या टेकडीमुळे चौफुलीवरून गावात आणि महामार्गावरून गावात जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. धोकेदायक वाहतूक बेट काढून येथे सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
 
महामार्गावरील वाहतूक बेट काढून येथे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, पोलिस प्रशासन निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने शहरातील वाहतूक बेट हटवून त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडून नियोजन सुरू आहे. वाहतूक बेटामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. शहरात व्यावसायिकांनी वीस वर्षांपूर्वी जाहिरात करण्यासाठी वाहतूक बेट बनवले होते. मात्र, त्यावेळी वाहनांची संख्या कमी होती. आज वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रस्त्यांची संख्या ‘जैसे थे’ आहे. हे वाहतूक बेट हटवून येथे सिग्नल यंत्रणा सुुरू केल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात टळणार आहे. याचप्रमाणे महामार्गावरील जुना ओझर जकात नाका येथे रस्ते प्राधिकरण विभागाने चौफुलीवर वाहतूक बेट निर्माण केले आहे. टेकडीसारखे बेट असल्याने आडगावमधून महामार्गाकडे जाणारे वाहन दिसत नसल्याने चौफुलीवर अपघात होतात. चौफुलीवर २०१६ या वर्षात २७ अपघात झाले आहेत. बेट काढण्याची मागणी केली आहे. मात्र, रस्ते प्राधिकरण विभागाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्ते प्राधिकरण विभागाने धोकेदायक वाहतूक बेट काढून टाकावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. 

धोकेदायक बेट 
आडगाव गावातून महामार्गावर येणाऱ्या वाहनांना दोन्ही बाजूंनी महामार्गावरील ये-जा करणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे अपघात घडतात. बेट काढले तर समांतर रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावरील वाहन महामार्गावरील वाहनचालकांना दिसतील. त्यामुळे अपघात संख्या घटेल. 

रस्ता धोकेदायक 
^वाहतूकबेटामुळे महामार्ग धोकेदायक झाला आहे. नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. बेट हटवून येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी. जेणेकरून अपघात टळले जाऊ शकतील. -सुनील जाधव, युवा सेना पदाधिकारी 

रोज अपघात 
^चौफुलीवर गतिरोधक भुईसपाट झाले आहेत. वाहने भरधाव वेगात ये-जा करतात. त्यामुळे चौफुलीवर रोजच अपघात घडतात. पायी रस्ता ओलांडताना भीती वाटते. -श्रावण जाधव, नागरिक 
 
बातम्या आणखी आहेत...