आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीच्या दुखण्यावर ‘ट्रॅफिक सेल’ हाच जालीम उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंदिरानगर येथील बाेगदा बंद केल्याने वाढलेला जनक्षाेभ, द्वारका सर्कलवर हाेणारा वाहतुकीचा खाेळंबा, पार्किंग स्थळांअभावी महत्त्वाच्या चाैकांत उडणारा वाहनांचा गाेंधळ, वाहतूक बेटांच्या अवाढव्य अाकारांमुळे काेंडीत झालेली वाढ, रस्त्यात अालेल्या झाडांमुळे गेलेले निष्पापांचे बळी हे अाणि अशा असंख्य समस्यांनी ताेंड वर काढले अाहे ते केवळ शहरात ट्रॅफिक सेल नसल्यामुळे. वाहतुकीच्या काेंडीला केवळ पाेलिस विभाग किंवा वाहतूक विभागच जबाबदार असल्याचा समज सर्वसामान्यांचा असला तरी प्रत्यक्षात ही काेंडी महापालिकेच्या उदासीनतेमुळेच हाेत असल्याचे अलीकडील काही घडामाेडींतून स्पष्ट झाले अाहे.
गेल्या काही वर्षांत महापालिका हद्दीत वाहतुकीच्या समस्येने डोके वर काढले आहे. मेनरोड, द्वारका, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, सीबीएस, शरणपूररोड, गंगापूररोड, अशोक स्तंभ, शालिमार या भागात वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दुचाकीधारकांना जमिनीवर पाय टेकवूनच वाहन चालवावे लागते, अशी परिस्थिती आहे. शहरातील बहुतांश व्यावसायिक इमारतींना पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे संबंधित इमारतींमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी, रस्त्याचा माेठा भाग या वाहनांनी अडविला जाऊन मार्गक्रमणासाठी अगदीच छाेटी जागा शिल्लक राहते. या जागेतून वाहने नेताना काेंडीच्या समस्येला सामाेरे जावे लागते. दुसरीकडे, इंदिरानगर परिसरातील बाेगद्याचा प्रश्नही काही दिवसांपासून एेरणीवर अाला अाहे. हा बाेगदा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात अाल्याने ताे बंद करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. परंतु, त्यानंतर त्यावर पर्याय शाेधण्याएेवजी ताे कायमस्वरूपी बंद करण्याचा खल करण्यात अाला. वास्तविक, एकतर्फी वाहतूक करताना इंदिरानगरच्या बाजूने सिग्नल बसविणे शक्य हाेते. हे काम महापालिकेने मनावर घेतले असते तर बाेगदा इतके महिने बंद ठेवण्याची गरजच भासली नसती. मात्र, पालिका प्रशासनाला नामानिराळे राहून पाेलिसांकडे अंगुलीनिर्देश करण्यात त्यांना धन्यता वाटली. शहरातील सर्व्हिस रस्त्यांचीही समस्या उड्डाणपुलाने वाढविली अाहे. दुसरीकडे गंगापूरराेड, तिडके काॅलनी ते गाेविंदनगर रस्ता, पेठ राेड, रविशंकर मार्ग, गंगापूरराेड ते भांेसला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणारा रस्ता या ठिकाणी रस्त्याच्या मधाेमध झाडे अाली अाहेत. त्यामुळे या झाडांवर वाहने अादळून अनेक अपघातही झाले अाहेत.

या सर्व समस्यांना कारणीभूत म्हणून पाेलिस विभागावर सडकून टीका झाली. पालिका मात्र या प्रकरणांत कातडी बचावची भूमिका घेत अाहे. वास्तविक, शहरातील वाहतुकीशी पालिकेचाही जवळचा संबंध अाहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, पार्किंग स्थळे निश्चित करून विकसित करणे, झाडांची संख्या पाहून रस्ते बांधणीचे नियाेजन करणे, याेग्य ठिकाणी याेग्य अाकारातील वाहतूक बेट बांधणे, झेब्रा क्राॅसिंग करणे, रम्बलर्स (गतिराेधकाचा प्रकार) उभारणे ही सर्व कामे महापालिकेची अाहेत अाणि या कामांचे नियाेजन करणे अाणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या अखत्यारीतील ट्रॅफिक सेलची असते. दुर्दैवाने नाशिक शहरात अाजवर ट्रॅफिक सेलच अस्तित्वात अालेला नाही.