आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त पार्किंगमुळे राेजच ‘ट्रॅफिक जाम’, वाहतूक पाेलिसांची साेयीस्कर माेहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्थाच नसल्यामुळे अनेकदा वाहनधारकांना रस्त्यावरच अापली वाहने लावावी लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशातून वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांविराेधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशी वाहने टोइंग करून दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईत केवळ दुचाकी वाहनांना लक्ष्य केले जात असून, ठराविक ठिकाणीच कारवाई हाेत असल्याच्या तक्रारी अाहेत.
शहरातील जिल्हा परिषद, ठक्कर बझार, सीबीएस, गडकरी चौक, त्र्यंबकरोड परिसरात थेट रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. यामुळे या रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना बऱ्याचदा तारेवरची कसरतच करावी लागते. पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला असताना वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र साेयीस्कर भूमिका घेत वाहतूक शाखेकडून ठराविक ठिकाणीच कारवाई हाेते. यातही धनाढ्यांच्या वाहनांकडे सर्रास डाेळेझाक करून केवळ दुचाकीच टाेइंग करण्याचे प्रकार वारंवार घडत अाहेत.

गडकरीचौकातही विळखा
गडकरी सिग्नलजवळ शासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी माेठ्या संख्येने नागरिक येतात. या ठिकाणी येणारे बहुतांश नागरिक अापली वाहने रस्त्यावरच उभी करून अन्य वाहनचालकांसाठी माेठा अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसून अाले अाहे. अशा बेशिस्त पार्किंगमुळे अनेकदा ट्रॅफिक जाम हाेऊन अपघातही हाेत असल्याचे वारंवार दिसून येते.

शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरच अशाप्रकारे वाट्टेल तेथे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक वारंवार खाेळंबते. वाहतूक पाेलिसांकडून दुचाकींना लक्ष्य केले जात असताना चारचाकी वाहनांवरही कारवाई हाेणे गरजेचे अाहे.

यांच्याकडे दुर्लक्ष का?
रस्त्यात वाट्टेल तेथे वाहने उभी करून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या अन्य वाहनचालकांना अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांवर कारवाई का हाेत नाही, असा सवाल काही दुचाकीचालकांनी ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीप्रसंगी उपस्थित केला. ज्यांची वाहने विनाकारण टाेइंग करून नेत शेकडाे रुपयांचा दंडही वसूल केला गेला अाहे.

विद्यार्थ्यांनाही धाेका
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेशिस्त वाहन पार्किंग पाेलिसांसाठी डाेकेदुखी ठरत असतानाच, रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ती धाेकादायक ठरत अाहे. अनेक शाळांच्या बाहेरच वाहनांची बेशिस्त पार्किंग असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अपघात हाेण्याचे प्रमाणही वाढू लागले असल्याच्या तक्रारी अाहेत.

‘दिव्या खालीच अंधार’
वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर असलेल्या महापालिकेच्या मार्केटमध्ये रेल्वे अारक्षण केंद्र, अँटी करप्शन ब्युराेच्या कार्यालयासह विविध व्यावसायिक शाॅप्स अाहेत. या मार्केटमध्ये येणारी वाहनेदेखील रस्त्याच्या कडेलाच पार्क केली जात असल्याने वाहतुकीस सतत अडथळा निर्माण हाेत असताे. तिबेटियन परिसरात सायंकाळच्या वेळेत येणारी ग्राहकांची वाहनेही रस्त्यालगतच पार्क केली जातात. यामुळे वाहतूक शाखेच्या कार्यालय परिसरातच वारंवार कोंडी हाेते.

शहरातील राजीव गांधी भवन, महापाैर निवासस्थान परिसर, ठक्कर बझार, काॅलेजराेड गंगापूरराेडवरील हाॅस्पिटल परिसर, एम. जी. राेड, रविवार कारंजा, टिळकवाडी, पंचवटी काॅलेज परिसर, मंगल कार्यालय परिसर, समांतर रस्ता, सिटी सेंटर माॅल परिसर, त्रिमूर्ती चाैक, गडकरी सिग्नलजवळ, जिल्हा परिषदेसमोर आदी भागात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे.

हॉटेल्सचे पार्किंग रस्त्यावरच; पाेलिसांची कृपादृष्टी
द्वारकाते पाथर्डी या मार्गावर सर्वाधिक संख्या हॉटेल्स व्यावसायिकांची आहे. बहुतांश हॉटेल्सचालकांनी पार्किंगची व्यवस्थाच केलेली नसल्यामुळे हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे समांतर रस्त्यावरील वाहतुकीस माेठा अडथळा निर्माण होतो. समांतर रस्त्यावर भाभानगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर आदींसह असंख्य उपनगरे आहेत. त्या परिसरात राहणारे विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी, महिलांसह नागरिकांना मार्गक्रमणासाठी समांतर रस्त्याचाच पर्याय असतो. मात्र, या रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अधिक धोकादायक बनला आहे.

जिल्हा परिषदेसमाेरील बेशिस्त पार्किंगही दुर्लक्षितच
जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या रांगा असतात. कोणत्याही कारवाईची भीती बाळगता अनेक नागरिकांकडून सर्रासपणे रस्त्यावरच वाहने लावली जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. येथे चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर असते. बऱ्याचदा या भागात वाहतूक पाेलिसांकडून दुचाकीचालकांना अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. मात्र, याच ठिकाणी रस्त्यावर उभ्या बेशिस्त चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असताना त्याकडे मात्र साेयीस्करपणे पोलिस कानाडोळा करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली अाहे.

वाहनांची संख्या...
माेटारसायकल : लाख३५ हजार १०१
अॅटाेरिक्षा : 21 हजार 282
चारचाकीखासगी कार : 1 लाख 51 हजार 274
इतरवाहने : 1 लाखn 50 हजार 754
बातम्या आणखी आहेत...