आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियोजनाचा खेळ; पाेलिस यंत्रणेचा बसेना मेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर अाल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्यानेे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आयुक्तांनी वाहतूक विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देऊनही सहायक पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास अपयशी ठरल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला.
शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाल्याचे दिसून अाले. पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतूक नियोजनाची माहिती घेतल्यानंतर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नियंत्रण कक्षाद्वारे समजले. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्तांना वाहतूक सुरळीत आणि नियोजन करण्यासाठी आदेश दिले. मात्र, सहायक आयुक्तांनी बिनतारी संदेश यंत्रणेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयुक्तांनी केलेल्या सूचनांची माहिती दिली. मात्र, सहायक आयुक्तांच्या या आदेशाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत वाहनात बसून राहणे पसंत केले. तत्कालीन सहायक आयुक्त वाहतूक नियोजनासाठी स्वत: रस्त्यावर फिरत होते. अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा आदरयुक्त धाक होता, मात्र सध्याच्या सहायक आयुक्तांना ही परिस्थिती हातळता येत नसल्याने सर्व नियोजनामध्ये एकूण विभागच अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

एबीबी सर्कलवर कोंडी : शनिवारीसायंकाळी एबीबी सर्कलवर अर्धा तास कोंडी निर्माण झाली होती. रविवारीदेखील कोंडी झाली होती. या कोंडीची वाहतूक विभागाने दखल घेतल्याने सलग दोन दिवस कोंडी झाली. वाहनधारकांना भरपावसात अडकून पडावे लागल्याने वाहतूक विभागावर संताप व्यक्त हाेत हाेता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भरणा, तरी नियोजनात फेल
वाहतूक विभागात सात वरिष्ठ निरिक्षक कार्यरत आहेत. मात्र एकाही अधिकाऱ्याला वाहतूक विभागाच्या कामाचा अनुभव नसल्याने शहरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक कोठून कुठे वळवायची याचेदेखील ज्ञान नसल्याने वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तांसह सात वरिष्ठ निरीक्षक नियोजनात फेल ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...