आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Problems At City Centre Will Solve, City Police Commissioner Ordered

सिटी सेंटरसमोरील कोंडी फोडण्याचा चंग, पोलिस आयुक्तांचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सुट्टीचादिवस असो की सण-उत्सव, वाहनचालक सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्यावर वाहने सर्रास उभी करून खरेदीसाठी जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे आहेत. खुद्द पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी रविवारी मॉलसमोर हजेरी लावत उपस्थित वाहतूक गंगापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

या सूचनेनंतर दिवसभरात ५० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. केवळ पावत्या फाडून दंड आकारण्यापेक्षा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी थेट न्यायालयात खटले दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिन दुस-या दिवशीही गंगापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवित ४० कारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. वाहन क्रमांकावरून कारमालकांचे नाव, पत्ते मिळवत कारवाई करण्यात आली. खटले दाखल केल्याने चालकांना जामीन द्यावा लागला. एरवी १००-२०० रुपये दंडाच्या पावत्या फाडून मोकळे होणा-या चालकांना न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे.

रविवारी आयुक्त सरंगल यांनी सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, एबीबी सर्कल मार्गावर पाहणी केली. वाहतूक पोलिसांना रस्त्यावर आडव्या-तिडव्या उभ्या असलेल्या कारचालकांना जागेवर दंड करण्याबरोबरच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. दुपारी १२ ते सायंकाळी वाजेपर्यंत चार-पाच वाहतूक पोलिस या ठिकाणी कारवाईसाठी हजर होते.
मॉलसमोरील उषाकिरण सोसायटी, लवाटेनगर भागात वाहने उभी केली जात असल्याने रहिवासी त्रस्त झाले असून या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या रांगा लागत असून, अपघाताच्या घटनाही वाढत आहेत. दरम्यान, नियमित कारवाई झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाश्यांनी व्यक्त केली.