आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांचा "व्याप', गाेळे काॅलनी रस्त्याची ‘पायवाट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैषधांची हाेलसेल बाजारपेठ म्हणून नावारूपाला अालेल्या गाेळे काॅलनीचे अाराेग्य ‘पार्किंग’अभावी खालावले असून, रस्त्याची ‘पायवाट’ झाली अाहे.

या भागात माेठ्या प्रमाणात इमारती उभ्या अाहेत. परंतु, बहुतांश इमारतींना पुरेसे ‘पार्किंग’च नाही. दुसरीकडे अाैषधे खरेदीसाठीजिल्ह्यातून अाैषध विक्रेते, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह अाणि सर्वसामान्य ग्राहक गाेळे काॅलनीत येत असतात. या ग्राहकांना अापली वाहने उभी करण्यास जागाच नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. त्यातच बऱ्याचशा दुकानदारांची चारचाकी वाहने रस्त्यातच उभी केली जातात. त्यामुळे अाधीच अतिशय अरुंद असलेला हा रस्ता अाणखी अरुंद हाेताे. परिणामी, परिसरात नेहमीच वाहतुकीची काेंडी असते. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या दुकानांना ‘पार्किंग’साठी जागाच नाही अाणि तरीही महापालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.