आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यातच दुरुस्ती, अपघातांची धास्ती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या सहाही विभागांतर्फे माेहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना माेकळा श्वास घेणे शक्य झाले. मात्र, महिनाभरातच अाता पुन्हा संबंधित ठिकाणांवर अतिक्रमणधारकांनी पाय पसरले असून, पालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा फायदा उचलत थेट रस्तेच ताब्यात घेतल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’ चमूने केलेल्या पाहणीत दिसून अाली अाहे. शहरातील वर्दळीच्या शिंगाडा तलाव परिसरातील मुख्य रस्त्यासह छाेट्या रस्त्यांवरही पुन्हा अतिक्रमण, पार्किंगचा प्रश्न गंभीर हाेऊ लागला अाहे. व्यावसायिक, गॅरेज, फिरते विक्रेते यांच्याकडे येणाऱ्या वाहनचालकांकडून पार्किंगअभावी रस्त्यातच वाहने उभी केली जातात. तासन््तास उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे कित्येकदा वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. परिसरात बँक, शाळा, एसटीचे कार्यालय, हाॅस्पिटल, हाॅटेल यांसह अग्निशमन दलाचे कार्यालय असूनही पालिका तसेच वाहतूक पाेलिस प्रशासन कारवाईत दिरंगाई करीत असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेते. अनेक व्यावसायिकांना वाहतूक पाेलिसांनी नाेटिसा बजावल्या असतानाही परिस्थितीत सुधारणा दिसून येत नाही. गेल्या वर्षी याच परिसरात अपघात हाेऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा एेरणीवर येऊन कारवाईही झाली हाेती. मात्र, कालांतराने पुन्हा समस्या जैसे थेच झाली अाहे.

अग्निशमन दलाचे मुख्यालय विळख्यात
शिंगाडातलाव परिसरात शहरातील अग्निशमन दलाचे मुख्य कार्यालय आहे. आग लागण्याच्या घटना घडताच तातडीने या मुख्यालयातून बंब रवाना होत असतात. मात्र, परिसरातील अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत असतो. विशेष म्हणजे, फायर स्टेशनच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग झोन’ असावा, असा वाहतुकीचा नियम असतानाही व्यावसायिक, गॅरेजचालकांकडून त्याकडे दुर्लक्षच हाेत अाहे. पालिकेकडून छोट्या अतिक्रमणधारकांवर केवळ कारवाईचा देखावा केला जात आहे.
मात्र, अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अशा वाहनांवर कारवाई करणार
^संबंधित परिसरातील व्यावसायिक गॅरेजचालकांमुळे वाहतुकीला अडथळा हाेत असल्याने अनेक दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अाता रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणार. प्रशांत वाघुंडे, सहायकपोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस

नाेटिसीला थेट केराची टाेपली
वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढल्याने वाहतूक पोलिस विभागाकडून काही दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या हाेत्या. मात्र, या नाेटिसीलाही केराची टाेपली दाखवत सर्रासपणे रस्त्यावरच दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे अाता वाहतूक पाेलिसांपुढेही अाव्हान उभे ठाकले अाहे.

अनेकदा होतो अडथळा...
^फायर स्टेशनच्या१०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असतो. मात्र, शिंगाडा तलाव परिसरात रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनास अनेकदा अडथळा निर्माण होतो. व्यावसायिकांनी याचा विचार केला पाहिजे. अनिल महाजन, मुख्याधिकारी,अग्निशमन दल
परिसरात राेजच मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती वा अन्य कामांसाठी वाहने या ठिकाणी येत असतात. त्यामुळे परिसरात प्लास्टिक पिशव्या, स्पेअर पार्ट्सचे रिकामे खोके, ब्लॅक फिल्स, कागद, पुठ्ठे, निकामी पार्ट्सचा कचरा रस्त्यावरच टाकण्यात येताे. काही दुकानदारांकडून रस्त्याच्याच कडेला हा कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिक, वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी अाहेत. अशा प्रकारांमुळे प्रदूषणात तर भर पडतेच, परंतु परिसरातील नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही गंभीर हाेत अाहे. पालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने माेहीम राबवून कारवाई करण्याची मागणी काही नागरिकांनी ‘डी.बी. स्टार’कडे केली अाहे.

मुंबई नाक्याकडून सारडा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा भंगार वाहनांचे जणू शाेरूमच थाटले असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना जिकिरीचे ठरते. अनेक गॅरेजचालकांनी नादुरुस्त वाहने रस्त्याच्याच कडेला पार्किंग केल्याने अनेकदा वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. विशेष म्हणजे, सिंहस्थापूर्वी पालिकेकडून या भागात कारवाई करण्यात अाली हाेती. मात्र, पुन्हा भंगार वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने याही रस्त्याचा अाता श्वास गुदमरू लागला अाहे.

शिंगाडा तलाव मार्गाच्या दुतर्फा विक्रेते गॅरेजचालकांची दुकाने अाहेत. बऱ्याचशा दुकानांत येणाऱ्या वाहनांची किरकाेळ दुरुस्ती थेट रस्त्याच्याच कडेला सुरू असल्याचा प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाला. अनेकांना दुरुस्तीसाठी जागाच नसल्याने किंवा वाहनांचा अाेघ वाढल्याने रस्त्याच्याच कडेला दुरुस्ती हाेते. यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत असून, अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले अाहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातील रस्ते, पार्किंग अन् अतिक्रमणाचा मुद्दा मात्र सुटण्याची चिन्हे नाहीत. शहर साैंदर्यावर भर देणाऱ्या पालिकेकडून सातत्याने कारवाई हाेत नसल्याने या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असून, विद्रुपीकरणात भर पडतेय.

शिंगाडा तलाव परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांसमाेर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे राेजच अशाप्रकारे वाहतुकीचा खाेळंबा हाेत असताे.

विद्रुपीकरणात पडतेय भर
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अन् सुरळीत वाहतुकीच्या दृष्टिकाेनातून अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणांवर पालिकेने बुलडाेझर चालवला. मात्र, महिनाभरातच अतिक्रमणधारकांनी पुन्हा पाय पसरल्याने या रस्त्यांचा श्वास पुन्हा गुदमरत अाहे. अशा परिस्थितीत मार्गक्रमण करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही दमछाक हाेत असून, अपघातांची मालिकाही वाढतच अाहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिंगाडा तलाव परिसरातही व्यावसायिकांच्या दुकानांसमाेरील अतिक्रमण, ग्राहकांची रस्त्यातच उभी राहणारी वाहने, रस्त्यातच हाेणारी दुरुस्तीची कामे, भंगार वाहनांचे रस्त्याच्या कडेलाच पडलेले अवशेष असे चित्र अाहे. कारवाईचा विसर पडलेल्या पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या सुटण्यापेक्षा अधिक जटिल हाेत अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा प्रकाशझाेत...
शिंगाडा तलाव, मुंबई नाका परिसरातील व्यावसायिक, गॅरेजचालकांमुळे वाहतुकीला हाेताेय अडथळा; वाहतूक पाेलिस-पालिकेकडून नाेटीस बजावण्यातच धन्यता
{ शिंगाडा तलाव, मुंबई नाका परिसरात गॅरेजचालक अन्य व्यावसाियकांकडे अालेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याचे काय?
ज्याभागातीलदुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत असेल, त्या दुकानांबाबत तातडीने चौकशी करू.
{रस्त्यावर नादुरुस्त वाहने उभी केली जात असल्याने शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे. अशा गॅरेजचालकांवर कारवाई कधी करणार?
रस्त्यावरचनादुरुस्तवाहने उभी करणाऱ्या गॅरेजचालकांच्या विरोधात लवकरच थेट कारवाई करणार आहाेत.