आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात अारटीअाेची पथनाट्याद्वारे वाहतूक सुरक्षा जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रादेशिक परिवहन विभागाकडून (अारटीअाे) राबवण्यात येणारे ‘सुरक्षित नाशिक’ अभियान नवीन वर्षातही सुरू राहणार अाहे. डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या अभियानाला वाहनचालकांसह नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या अभियानात सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यामध्ये अाता पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार अाहे. 
 
‘रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित नाशिक’ अभियान हे संयुक्त अभियान आरटीओ पोलिस प्रशासनाने एकाच वेळी सुरू केले होते. आरटीओ विभागाच्या सुरक्षित नाशिक अभियान सुरू आहे. ते नव्या वर्षातही कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक विभागाकडून मात्र रस्ते सुरक्षा अभियानाचा फज्जा उडला. काही दिवस सुरू राहिलेले हे अभियान नंतर रेंगाळले. या शहर वाहतूक विभागाने हेल्मेटसक्ती कारवाईचा धडाकेबाज प्रारंभ केला मात्र, नंतर महसूल ‘वसूली’ला प्राधान्य दिल्याने या कारवाईला अचानक ब्रेक लागला. त्यामुळे कारवाईबाबत शंका उपस्थित झाली. आरटीओ विभागाने मात्र कारवाईत सातत्य राखत नागरिकांमध्ये प्रबोधनही केले. या कारवाईला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षातदेखील ही कारवाई सुरू राहणार आहे. दंडात्मक कारवाईसह हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहतूक नियनांचे पालन करण्याबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी नागरिकांसह वाहनधारकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. एकूणच अारटीअाेकडून वाहतूक सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार अाहे 

अभियानास माेठा प्रतिसाद 
^वाहतूक नियमांचे नागरिकांना आकलन व्हावे, यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. याबाबत नियोजन करण्यात येत आहे. अभियानास नागरिकांसह वाहनचालकांनी प्रतिसाद दिला. नव्या वर्षातही हे अभियान सुरूच राहणार आहे. -भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...